मुंबई - चार ते पाच वर्षापूर्वी छोट्या पडद्यावर येणारी 'बालिका वधू' ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. यात काम करणाऱ्या अभिनेत्यांना या मालिकेमुळे विशेष ओळख मिळाली होती. आनंदी आणि तिच्या कुटुंबाचे चित्रण यात करण्यात आले होते. यात महत्वाच्या व्यक्तीरेखा शिवम, दादीसा आणि आनंदी यांनाही भरपूर लोकप्रियता मिळाली. शिवमची सिद्धार्थ, दादीसाची सुरेखा सिक्री आणि आनंदीची भूमिका नंतर प्रत्युषा बॅनर्जीने साकारली होती.
योगायोगाची गोष्ट म्हणजे या तिन्ही व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार आपल्यात राहिले नाही. यात प्रत्युषा, सुरेखा सिक्री आणि सिध्दार्थचे निधन झाले. 1 एप्रिल 2016 रोजी प्रत्युषाचा मृतदेह मुंबईतील तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. दादी सा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचेही 16 जुलैला हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्याआधी त्याला दोनदा ब्रेन स्ट्रोक झाला होता. आणि गुरूवारी दुपारी सिध्दार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
विचित्र योगायोग
यातील सुरेखा सिक्री आणि सिध्दार्थ यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तर प्रत्युषाने स्वत: आत्महत्या केली होती. गुरूवारी सिध्दार्थच्या अचानक निधनानंतर त्याच्या चाहत्यांनी याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
हेही वाचा - सिध्दार्थ घरी परतला तेव्हा त्याच्या कारची काच फुटली होती..नेमक रात्री काय घडले?