ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठी -3 : “करूया आता कल्ला” टास्कमुळे वादविवाद वाढले

author img

By

Published : Oct 16, 2021, 3:46 PM IST

बिग बॉस मराठीमधील “करूया आता कल्ला” या टास्कमुळे आणि स्टार मिळविण्याच्या शर्यतीत बरेच मतभेत, गैरसमज आणि वादविवाद झालेत. त्यामुळे काल मित्र असलेले स्पर्धक आज शत्रू असल्यासारखे वागत आहे. दिवसेंदिवस शोमधील रंगत वाढत चालली आहे.

बिग बॉस मराठी -3
बिग बॉस मराठी -3

बिग बॉस मराठीमधील “करूया आता कल्ला” या टास्कमुळे आणि स्टार मिळविण्याच्या शर्यतीत बरेच मतभेत, गैरसमज आणि वादविवाद झालेत. दिलेला शब्द न पाळल्यामुळे सदस्यांमध्ये थोडीशी नाराजी झालेली दिसून येते आहे. संतोष चौधरी (दादूस) सोबत याच विषयावर तृप्तीताई आणि विशाल चर्चा करताना दिसले. तृप्ती देसाई आणि विशाल यांनी दादूसला विचारले की, “आपलं बोलणं झालं होतं ना तृप्ती ताईंना नाही विशालला स्टार द्यायचा. तुम्ही शब्द देऊ नका मग.” तृप्ती देसाई म्हणाल्या, “तुम्ही असे शब्द दिले ना तर उद्या अवघड होईल तुमचं”. त्यावर दादूस यांचं म्हणण आहे, “मी माझ्या डोक्याने खेळतो कोणाच्या सांगण्यावरुन खेळत नाही आणि खेळणार पण नाही. आणि मला काही अवघड होणार नाही, मी कोणाला घाबरत नाही. मी माझ्या मनाचा राजा आहे”.

बिग बॉस मराठी -3
बिग बॉस मराठी -3

उत्कर्ष जय, गायत्री, मीरा व विकासला काही तरी सांगू इच्छित होता. विकास जेव्हा उत्कर्षकडे मत मागयला गेला तेव्हा उत्कर्ष म्हणाला, “मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आम्ही सगळे उभे राहू तुझ्या बाजूने, पण इकडची जबाबदारी कोण घेणार? मी कसं म्हणतो आहे आम्ही सगळे तुझ्या बाजूने उभे राहू, आम्हांला वाटतं आहे तू यावं. विशालचा फक्त चेहरा आहे आणि मागे ‘तो’ आहे. तो त्याची सत्ता आणण्यासाठी विशालचा वापर करतो आहे. विशाल भोळा आहे, तो विशालचा वापर करतो आहे. विशाल वाटतं आहे मी कॅप्टन होतो आहे ना बस मग. त्याला हे कळत नाहीये तो त्याचा वापर करून त्याला फेकून देणार, मग काय फायदा ? आज विशाल आहे उद्या तो कोणाचा पण वापर करेल फायदा काय... ते पण आल्या आल्या.”

बिग बॉस मराठी -3
बिग बॉस मराठी -3

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - गुलाबो सिताबो फेम फर्रुख जाफर यांच निधन; 89 वर्षी घेतला अखेरचा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.