मुंबई डायरीज 26/11 एक काल्पनिक मेडिकल ड्रामा असून त्या भयानक, अविस्मरणीय रात्रीच्या पार्श्वभूमीवर आहे, ज्याने एका बाजूला शहराला नष्ट केले मात्र, दुसऱ्या बाजूला लोकांची एकजुट केली आणि कोणत्याही संकटाचा एकजुटीने सामना करण्याच्या भावनेला प्रबळ केले. या सिरीज ला मिळणारी प्रतिसाद पाहून मेकर्स खूश झालेत आणि निखिल अडवाणी व्यक्त होत म्हणाले की, "प्रत्येकाच्या प्रयत्नाला मिळणारे यश पाहणे खूप चांगले वाटतेय."
मुंबई डायरीज 26/11 ही वेब सिरीज प्रदर्शित झाली असून तिला समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडूनही ‘थंब्स अप’ मिळालाय. या मालिकेला समीक्षकांनी गौरवले तर आहेच पण प्रेक्षकांचा देखील या शोला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. यामध्ये अभिनयापासून पटकथा आणि दिग्दर्शनापर्यंत सर्वच बाबी उत्तम असून जमून आल्या असून दिग्दर्शक निखिल आडवाणी यांनी नुकत्याच याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
निखिल आडवाणी म्हणाले की, "दर्शक प्रत्येक बाजूने कौतुकाचे सुंदर संदेश पाठवत आहेत आणि या तऱ्हेच्या अभूतपूर्व प्रतिक्रिया मिळणे, हा खूपच सुखद अनुभव आहे. मुंबई डायरीज़ 26/11 ला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्ही सर्वच जण खूप आनंदित झालो आहोत. आमच्या सर्वांच्याच प्रयत्नांचे दर्शकांकडून कौतुक होताना पाहणे चांगले आहे, खासकरून तेव्हा, जेव्हा सांगितली गेलेली गोष्ट तुमच्या मनाच्या खूप जवळ असते. प्रेक्षकांच्या या प्रतिक्रियांनी शोला मस्ट-वॉच बनवले आहे आणि मी याबाबत कृतज्ञ आहे."
निखिल अडवाणीद्वारे रचित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस सहदिग्दर्शित ‘मुंबई डायरीज 26/11’ ही मालिका, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांची अप्रकाशित कथा सादर करते. या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत.
मुंबई डायरीज 26/11 हा शो ९ सप्टेंबरला प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झालाय.
हेही वाचा - फेडरेशन ऑफ फिल्मसिटीच्या 6 हजार लोकांचे लसीकरण