ETV Bharat / sitara

‘देवमाणूस’ मालिकेत क्रूर देवमाणसामागे लपलेला खरा चेहेरा बाहेर येईल का?

झी मराठीवर सत्य घटनेवर आधारित मालिका ‘देवमाणूस’ प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. मालिकेचा शेवट जवळ येत चालला असला तरी कथानकातील उत्कंठता तसूभरही कमी झालेली नाहीये.

author img

By

Published : Jun 8, 2021, 3:18 PM IST

'Devmanus' series is interesting
‘देवमाणूस’ मालिका रंजक वळणावर

झी मराठीवर सत्य घटनेवर आधारित मालिका ‘देवमाणूस’ प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. मालिकेचा शेवट जवळ येत चालला असला तरी कथानकातील उत्कंठता तसूभरही कमी झालेली नाहीये. डॉ. अजितकुमार देव याला अटक झाल्यानंतर त्याच्या डोक्यात नव्या खेळीची समीकरणं सुरु झाली आहेत. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याच्यावरील खटल्याची कोर्टाची तारीख जाहीर झाली असली तरी तत्पूर्वी अजित नक्कीच काहीतरी काळेबेरे करणार अशी शक्यता प्रेक्षकांना वाटतेय यावरून कल्पना येईल की ‘देवमाणूस’ मालिकेमध्ये प्रेक्षक किती गुंतला आहे ते.

'Devmanus' series is interesting
‘देवमाणूस’ मालिका रंजक वळणावर

भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर, झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकत नाहीये, ह्या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागलीयेत. आणि त्यासाठी तो डिम्पल ची मदत घेतोय. इकडे सगळं गाव डॉ. अजितच्या मागे उभं आहे कारण तो गावासाठी देवमाणूस आहे. पण एसीपी दिव्या सुद्धा आपल्या निर्णयावर ठाम आहे तिने अजित विरुद्धचे सगळे पुरावे गोळा केलेत आणि ते मी कोर्टातच सगळ्या जगासमोर आणेन आणि ह्या देवमाणसामागे लपलेला खरा चेहेरा बाहेर आणेन असं सांगते.

'Devmanus' series is interesting
‘देवमाणूस’ मालिका रंजक वळणावर

एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस’. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत किरण गायकवाड असून त्याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.

'Devmanus' series is interesting
‘देवमाणूस’ मालिका रंजक वळणावर

डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग खटल्याची कोर्टाची तारीख पडलेय, पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना संपूर्ण गाव बाहेर जमलाय. अजित त्याची केस स्वतःच लढणार असं ठरवतो. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या चतुरपणाची कल्पना येते. डिम्पलच्या घरातील सगळे अजूनही अजितच्या बाजूने आहेत. समोर येणारे साक्षीपुरावे पाहून ते देखील संभ्रमात आहेत. आता पुढे ही कोर्टकेस कशी सरकेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सत्य घटनेवर आधारित ‘देवमाणूस’ ही मालिका प्रसारित होते सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. झी मराठीवर.

हेही वाचा - मानहानी प्रकरण; सलमान खानचा न्यायालयात नव्याने अर्ज दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.