ETV Bharat / sitara

मराठी साहित्यातील नवा प्रवाह ठरलेली कादंबरी 'लॉक ग्रिफिन' आता ‘ऑडिओबुक’मध्ये 'स्टोरीटेल'वर! - 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी 'स्टोरीटेल'वर

मराठी साहित्यातील एक वेगळा नवा प्रवाह ठरलेली 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार असून ती रसिकांना 'स्टोरीटेल'ने उपलब्ध करून दिली आहे. 'लॉक ग्रिफिन' ही वसंत वसंत लिमये यांची अत्यंत उत्कण्ठावर्धक रोमांचकारी कादंबरी आता ‘स्टोरीटेल’च्या लोकप्रिय ऑडिओबुक श्रेणीत स्वतः लेखक वसंत वसंत लिमये धीरगंभीर आवाजात प्रदर्शित होत आहे. ‘लॉक ग्रिफिन’ मध्ये सत्य घटनांवर आधारित एक विस्तृत कॅनव्हास रंगवला गेला आहे.

The novel 'Lock Griffin'
'लॉक ग्रिफिन' आता ‘ऑडिओबुक’मध्ये 'स्टोरीटेल'वर!
author img

By

Published : May 25, 2021, 2:57 PM IST

सध्या पुस्तक वाचनाची सवय मागे पडत चालली असून आजच्या तरुण पिढीला आपल्या समृद्ध साहित्याची ओळख व्हावी म्हणून पुस्तक ‘ऑडिओ’ रूपात येऊ लागली आहेत. मराठी साहित्यातील एक वेगळा नवा प्रवाह ठरलेली 'लॉक ग्रिफिन' ही कादंबरी श्रोत्यांसाठी पर्वणी ठरणार असून ती रसिकांना 'स्टोरीटेल'ने उपलब्ध करून दिली आहे. आयआयटीमधून बीटेक पदवीधर असलेले लेखक वसंत वसंत लिमये यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय त्यांच्या नावापासूनच होतो. १९९१-९२ या कालावधीत लेखक वसंत वसंत लिमये अपघातानंच मुंबईच्या एका सायंदैनिकात 'धुंद स्वच्छंद' स्तंभ लिहून लेखनाकडे वळले. या लेखांवर आधारित १९९४ साली पाहिलं पुस्तक प्रकाशित झालं. त्यानंतर 'लॉक ग्रिफिन' ही त्यांची पहिली कादंबरी २०१२ 'ग्रंथाली'ने प्रकाशित केली. त्यानंतर त्यांच्या 'कॅम्पफायर', 'विश्वस्त' या कादंबऱ्याही 'लॉक ग्रिफिन' प्रमाणे भव्यदिव्य असल्याने लोकप्रिय ठरल्या आहेत.

The novel 'Lock Griffin'
'लॉक ग्रिफिन' आता ‘ऑडिओबुक’मध्ये 'स्टोरीटेल'वर!

'लॉक ग्रिफिन' ही वसंत वसंत लिमये यांची अत्यंत उत्कण्ठावर्धक रोमांचकारी कादंबरी आता ‘स्टोरीटेल’च्या लोकप्रिय ऑडिओबुक श्रेणीत स्वतः लेखक वसंत वसंत लिमये धीरगंभीर आवाजात प्रदर्शित होत आहे. ‘लॉक ग्रिफिन’ मध्ये सत्य घटनांवर आधारित एक विस्तृत कॅनव्हास रंगवला गेला आहे. 'लॉक ग्रिफिन' एखाद्या इंग्रजी रहस्यमय कादंबरीप्रमाणे ही कादंबरी भारतातील अनेक राज्ये व अमेरिकेत फिरवून आणते. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील तीन पिढ्यांची गोष्ट सोबत एक राजकीय थ्रिलर आहे. एक वेगळ्या प्रकारचा अनोखा आणि आश्चर्यचकित करणारा आनंद ती देते.

‘लॉक ग्रिफिन’मध्ये शर्मा कुटुंब म्हणजे गांधी घराणे यात इन्दू शर्मांची हत्या १९८४ ते आदित्य शर्माची मानवी बॉम्बने हत्या हे सन्दर्भ येतात. भीष्मराज सिन्हा उर्फ़ नानाजी हे पात्र अटलबिहारीजींशी हुबेहुब जुळते. राजीव गांधींच्या हत्येच्या शोधाचा दुसऱ्या एका कौटुंबिक हत्या व अपघातानंतर सुरु झालेला शोध् एका समांतर पातळीवर सुरु असतांना श्रोत्यांना अनेक वेळा सत्य व् काल्पनिक सिमारेषेवरुन उदिष्ठाप्रत आणून ठेवतो. ‘लॉक ग्रिफिन’ही अशीच एक उत्कंठावर्धक कादंबरी आहे, जी अगदी शेवटपर्यंत रहस्य जपून ठेवते. स्वतः लेखकच हे रसिक श्रोत्यांना ही कादंबरी त्यांच्या धीरगंभीर आवाजात कादंबरीतील केलेली वर्णने ऐकत असल्याने श्रोते ऐकता ऐकता जगातील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असल्याची भावना तयार होते. लेखकाने त्या-त्या ठिकाणांचे अगदी बारीक सारीक तपशिलासह केलेले वर्णन कौतुकास्पद आहे. लेखन-संशोधन कार्यासाठी लेखकाने कोकण ते कॅलिफोर्निया आणि नैनिताल ते स्कॉटलंड अशा अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. या ठिकाणांच्या वर्णनासाठी वापरलेली निरीक्षण शक्ती ही खरोखरच अवर्णनीय आहे. या निरीक्षणातून लेखकाने कादंबरीतील कथानकाला अनोखा साज चढवला आहे आणि ही या कादंबरीची मोठीच खासीयत आहे. त्यामुळे रसिकश्रोत्यांनी 'स्टोरीटेल'वर हा अनुभव नक्की घ्यावा.

लेखकाने यासाठी खूप संशोधन केले आहे. कादंबरीतील घटना, प्रसंग व व्यक्तिरेखांचा सखोल अभ्यास भौगोलिक व सांस्कृतिक इतिहास घटनांशी जोडल्याने कादंबरी प्रवाही बनली आहे. गढ़वाल, नैनीताल, वॉशिंग्टन, स्कॉटलैंड, ते पाचगनी, श्री क्षेत्र महुली, नाशिक, गोदाघाट या स्थळांचे अत्यंत ज्वलंत चित्रण ‘लॉक ग्रिफिन’मध्ये आले आहे.

'स्टोरीटेल'द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे.

हेही वाचा - तौक्ते वादळाचे भयाण रुप व्हिडिओत कैद; पाहा अंगावर काटा आणणारी दृश्ये..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.