ETV Bharat / sitara

डान्सवरील शो ‘चीकू की मम्मी दूर की’च्या प्रोमोत दिसतोय ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती! - 'Disco Dancer' Mithun Chakraborty!

स्टार प्लसचा आगामी शो, ‘चीकू की मम्मी दूर की’ आपल्या पहिल्या प्रोमोपासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा शो आई-मुलीचे प्रेमळ नाते दाखवतो आणि त्यांच्यामध्ये नृत्य हा सामायिक धागा आहे. जेव्हा प्रोमोने दर्शकांना खिळवून ठेवलेच आहे तिथे स्टार प्लसने आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला.

‘चीकू की मम्मी दूर की’
‘चीकू की मम्मी दूर की’
author img

By

Published : Aug 26, 2021, 7:37 PM IST

सध्या देशातील कोरोना परिस्थिती सुधारत चालली आहे. मनोरंजनसृष्टीसुद्धा पुन्हा एकदा सावरत चालली आहे. अनेक नवीन मालिका आणि शोज येताहेत. असाच एक स्टार प्लसचा आगामी शो, ‘चीकू की मम्मी दूर की’ आपल्या पहिल्या प्रोमोपासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा शो आई-मुलीचे प्रेमळ नाते दाखवतो आणि त्यांच्यामध्ये नृत्य हा सामायिक धागा आहे. जेव्हा प्रोमोने दर्शकांना खिळवून ठेवलेच आहे तिथे स्टार प्लसने आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला.

शोच्या निर्मात्यांनी 'चीकू की मम्मी दूर की'च्या नवीनतम प्रोमोसाठी प्रतिष्ठित डिस्को डान्सर, मिथुन चक्रवर्ती यांना सहभागी करून घेतले आहे. डांस शो असल्याकारणाने, या प्रोमोची शोभा वाढवण्यासाठी मिथुन चक्रवर्ती यांच्यापेक्षा योग्य नाव आणखी कोणते असू शकेल असे निर्मात्यांची भावना होती. 'चीकू की मम्मी दूर की' चा हा नवा प्रोमो मिथुनजींच्या तेजस्वी व्यक्तित्व आणि आकर्षक आवाजात इतका आकर्षक वाटत आहे की प्रेक्षक शोच्या लॉचिंगची वाट पहात आहेत. निश्चितच, हा नवीनतम प्रोमो पाहिल्यानंतर कोणीही म्हणेल, ‘क्या बात, क्या बात, क्या बात!’

‘चीकू की मम्मी दूर की’
‘चीकू की मम्मी दूर की’

परिधि शर्मा आणि वैष्णवी प्रजापति या शोच्या मुख्य कलाकारांना देखील मिथुन आपल्या शोसोबत जोडले जात आहेत, हे बघून अत्यानंद होत आहे. निर्माता गुल खान याविषयी म्हणाल्या की, "आमचा आगामी शो 'चीकू की मम्मी दूर की' हा एक सुंदर शो आहे ज्यामध्ये आई आणि मुलीमधला त्वेष, भावना आणि एक प्रेमळ बंध दर्शवतो जो परिस्थितीमुळे वेगळे झाल्यानंतर देखील नृत्याच्या माध्यमातून एकमेकांसोबत जोडून ठेवतो. आज दर्शकांकडे कंटेंटसाठी अनेक विकल्प आहेत, हे लक्षात घेऊन दर्शकांच्या विकसित आवडीला कथानकामध्ये उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.”

त्या पुढे म्हणाल्या की, "आम्हाला वाटले की मिथुनजींच्या उपस्थितीने प्रोमोत अधिक वास्तविकता येईल. त्यांचे या प्रोमोसोबत जोडणे, खरोखर अद्भुत आहे आणि मिथुन सरांनी या शोमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या खरोखर जादुई आहेत. मिथुन चक्रवर्ती यांची जीवन कहानी, जे स्वतः एक लीजेंड आहेत आणि प्रसिद्ध होण्याआधी त्यांनी खूप कठिण परिस्थितीचा सामना केला आहे. या मालिकेत त्यात खूप साधर्म्य आहे.”

हेही वाचा - ‘यु टर्न’ संपवून अलाया एफने कार्तिक आर्यनसोबत केली 'फ्रेडी'च्या शुटिंगला सुरुवात!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.