ETV Bharat / sitara

'आय एम नॉट मसिहा' पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला - The name of the book 'I am not the Messiah'

मजूरांचा रियल सुपरहिरो सोनू सूदच्या कार्यावर आधारित पुस्तक येत आहे. 'आय एम नॉट मसिहा' असे या पुस्तकाचे नाव असलेले हे पुस्तक जर्नालिस्ट मीना के अय्यर यांनी लिहिले आहे.

'I am not the Messiah
'आय एम नॉट मसिहा'
author img

By

Published : Dec 30, 2020, 5:02 PM IST

मुंबई - अभिनेता सोनू सूदच्या कार्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होत आहे. 'आय एम नॉट मसिहा' असे या पुस्तकाचे नाव आहे. जर्नालिस्ट मीना के अय्यर यांनी लिहिलेले हे पुस्तक पेंग्विन या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होणार आहे.

भारतात जेव्हा कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली तेव्हा देशभर पसरलेल्या प्रवासी मजूरांसाठी संकटाचा काळ सुरू झाला. या मजूरांना आपल्या घरी परतायचे होते. मात्र रेल्वे सेवा बंद, वाहतूक बंद असल्यामुळे बससेवाही बंद झाल्या. मजूरांचे हाल सुरू झाले. पुरेसे अन्न नाही, राहायला जागा नाही, मुलाबाळांचा उपवास सुरू झाला. अशावेळी सोनू सूद देवदूत बनू मजूरांच्या मदतीला धावला. त्याने हजोरो मजूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी देशभर एक जाळे विणले. प्रवासी मजूर आपल्या घरी परतले आणि देशभरातून सोनू सूदला मसिहा म्हणून ओळखले जाऊ लागले. याच विषयाला वाहिलेले हे पुस्तक आता वाचकांच्या हाती येत आहे.

हेही वाचा - २०२०: रुपेरी पडद्यासह या जगाचा निरोप घेतलेले प्रतिभावंत कलाकार

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती आपल्या ट्विटरवर दिली आहे. या पुस्तकाच्या शीर्षकासह सोनू सूदचा एक फोटो त्यांनी शेअर केलाय.

हेही वाचा - रणबीर कपूर आणि आलिया भट्टची रणथंभोरमध्ये होणार एंगेजमेंट?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.