ETV Bharat / sitara

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार करताहेत स्वतःची ‘आरोग्यसेवा’! - 'Aai Kuthe Kay Karte?' Seial on Star Pravah

राज्यातील लॉकडाऊनमुळे मनोरंजनक्षेत्रातील मंडळी महाराष्ट्राबाहेर जाऊन शूट करू लागली आहेत. मुंबईतील ‘डेली रुटीन’ पाळता येत नसल्यामुळे सिल्वासा येथे शूटिंग करीत असलेले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार स्वतःची ‘आरोग्यसेवा’ करीत आहेत.

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार
author img

By

Published : May 27, 2021, 10:55 PM IST

गेल्या दोनेक वर्षात ‘आरोग्य’ या शब्दाला आणि विषयाला अतोनात महत्व प्राप्त झालंय. कोरोना महामारीमुळे सतत धावणारा मनुष्यप्राणी घरट्यात कैद झालाय. कोरोना विषाणूच्या अनाकलनीय ‘वागण्यामुळे’ सर्वचजण औषधांऐवजी स्वतःच्या आरोग्याकडे गंभीरपणे पाहू लागलेत. स्वतःची आरोग्यसेवा आणि प्रतिकारशक्ती या आणि कुठल्याही विषाणूला हरवू शकते हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झालाय. राज्यातील लॉकडाऊनमुळे मनोरंजनक्षेत्रातील मंडळी महाराष्ट्राबाहेर जाऊन शूट करू लागली आहेत. मुंबईतील ‘डेली रुटीन’ पाळता येत नसल्यामुळे सिल्वासा येथे शूटिंग करीत असलेले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार स्वतःची ‘आरोग्यसेवा’ करीत आहेत.

कलाकारांचे दमदार अभिनय आणि तितक्याच ताकदीचे संवाद आणि दिग्दर्शनामुळे स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मालिकेचं कथानक देखिल सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे त्यामुळे यापुढील भाग देखिल मनोरंजनाने परिपूर्ण असतील अशी ग्वाही मालिकेची पूर्ण टीम देतेय. या मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासामध्ये सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण टीम एकत्र एका छताखाली आहे. या क्षेत्रात फिटनेसला जास्त महत्व असल्यामुळे मालिकेतील सर्वजण एकच आरोग्यमंत्र पाळताना दिसताहेत आणि सेटवर व्यायामाला महत्त्व दिलं जातंय. एकाच जागी शूटिंग आणि राहण्याची सोय असल्याने एक छान कुटुंब तयार झालं आहे. त्यामुळे शूटिंगसोबतच सकाळच्या नाश्ता, जेवणापासून ते अगदी व्यायामापर्यंत सर्व काही ठरवून एकजुटीने केलं जातंय.

या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. “सेटवर मी अपूर्वा गोरे आणि गौरी कुलकर्णी म्हणजेच मालिकेतली इशा आणि गौरी आम्ही तिघी न चुकता व्यायाम करतो. योगाच्या आसनांसोबतच निसर्गरम्य वातावरणात तासभर चालणं हे आमचं नित्याचं आहे. शूटिंग संपलं की आम्ही सर्व एकत्र डिनर करतो. त्यानंतर वॉक हा ठरलेला. शूटिंगमधूनही वेळ काढत हॉटेलच्या रुममध्ये आम्ही ठरवून व्यायाम करतो. लॉकडाऊनमुळे सध्या जिम वैगेरेचा पर्याय नसल्यामुळे उपलब्ध गोष्टींचा सदुपयोग करण्याचा माझा प्रयत्न असतो”, रुपाली भोसले म्हणाली.

पुढे सांगताना रूपाली म्हणाली, “दिवसभराच्या गडबडीतून मी स्वत:साठी १ तास तरी काढते. सध्या सेटवर खूपच आल्हाददायक वातावरण आहे. सेटच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत. त्यामुळे मोकळी आणि शुद्ध हवा आम्ही अनुभवतोय. सध्याच्या घडीला ऑक्सिजनचं महत्त्व आपल्या सर्वांनाच कळतं आहे. त्यामुळे शूटिंगच्या निमित्ताने ही हिरवाई अनुभवायला मिळतेय याचा आनंद आहे. आम्हा सर्वांच्या डाएटचीही सेटवर काळजी घेतली जातेय. माझं प्रत्येकालाच एक आवाहन आहे की तुम्हीसुद्धा स्वत:च्या आरोग्यासाठी योग्य डाएट आणि व्यायामाची साथ घेतली तर उत्तम जीवनशैली अनुभवू शकाल.”

‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर प्रसारित होते .

हेही वाचा - दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या हृदयावर झाली शस्त्रक्रिया!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.