शिर्डी (अहमदनगर) - चौथीतून आता पाचवीत गेलेली राशीचे खेळण्या बागडण्याचं वय असताना राशीला टिक-टॉकचं वेड लागलंय. राशीची आई अश्विनीने आपले टिकटॉकवर अकाऊंट बनवले. ती त्यावर टिकटॉक व्हिडिओ बनवत असताना राशीही पहात असे. कधी-कधी राशीही आई बरोबर टिकटॉकमध्ये सामील होत असे. नंतर राशीतील कला गुण पाहून राशीचाच टिकटॉक व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. राशीची अदा, कॅमेऱ्याला सहज सामोरे जाण्याचा तिची क्षमता पाहून तिच्या आई-वडिलांनी प्रोत्साहन देत तिचेच टिकटॉक व्हिडिओ बनविण्यास सुरुवात केली. अवघ्या काही दिवसातच राशी आता टिकटॉकवर फेमस झाली असून तिचे साडेतीन लाखाच्या आसपास व्हिव्हर्स आहेत....
राशीची आई मुळची शिर्डीची. सर्वसामान्य कुटुंबियात लग्न झाल्या नंतर अश्विनी ही कोपरगावला स्थायिक झाली. पुण्याला एका लग्नात काही मुली टिकटॉक करतांना पाहून अश्विनीनेही टिकटॉक वर व्हिडिओ बनवायला सुरवात केली. सुरवातीला तिला समाजातून, नातेवाईकांकडून व्हिडिओ बनवू नको सांगीतल गेलं. मात्र अश्विनीला तिच्या पतीने आणि सासूने साथ दिली. नंतर तिच्या मुलीत गुण पाहून आता अश्विनी ही राशीची आई म्हणून ओळखल जावू लागली असून त्यांच्या व्हिडीओला चार चार लाखापर्यत विव्हर्स आहेत..
राशी सध्या कोपरगावतील एका खाजगी शाळेत पाचवीत शिकते. शिक्षणात लक्ष देते. दररोज शाळा क्लासेस आणि जमलं तर व्हिडीओ करते. रविवारी आपल्या कुटुंबियासमवेत आणि इतर कलाकारांसमवेत ती टिकटॉक व्हिडीओ आवार्जुन बनवते..राशीने बबन चित्रपटातील एका गाण्यावरील टिकटॉक व्हिडिओ पाहून सोशल मीडियाच्या माध्यमातून राशीचा शोध घेत तिच्याशी संपर्क साधत प्रोत्साहन दिलंय. राशीलाही आता अँक्टीग क्षेत्रात आपल नाव करायचंय...