ETV Bharat / sitara

बिग बॉस 15 संपताच 7 फेरे घेणार हे जोडपे, बेघर झालेल्या स्पर्धकाचा दावा - Rakhi Sawant's husband Riteish is out of Bigg Boss

बिग बॉस 15 मध्ये गेल्या वीकेंड का वारमद्ये, दोन स्पर्धक राजीव अडातिया आणि राखी सावंतचा पती रितेश बेघर झाले. घराबाहेर पडताच राजीव अडातिया यांनी करण आणि तेजस्वीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

तेजस्वी प्रकाश आणि करण
तेजस्वी प्रकाश आणि करण
author img

By

Published : Dec 20, 2021, 8:06 PM IST

मुंबई - टीव्हीचा सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 15' च्या अखेरीस घरात नवीन खळबळ उडाली आहे. घराच्या एका बाजूला काही स्पर्धक एकमेकांच्या जीवाचे शत्रू झाले आहेत, तर घराच्या दुसऱ्या कोपऱ्यातही रोमान्स सुरू आहे. बिग बॉस 15 चे लव्हबर्ड्स करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या गुप्त प्रेमकथांबद्दलचा खुलासा समोर आला आहे. लवकरच ते लग्नही करणार असल्याचा दावा केला गेला आहे.

बिग बॉस 15 मध्ये गेल्या वीकेंड का वारमध्ये दोन स्पर्धक राजीव अडातिया आणि राखी सावंतचा पती रितेश बेघर झाले. घराबाहेर पडताच राजीव अडातिया याने करण आणि तेजस्वीबद्दल मोठा धमाकेदार खुलासा केला होता. किंबहुना राजीवने या जोडप्याचे बिग बॉसच्या घरात असलेले गुपचूप प्रेमाचा उघड खुलासा केला आहे.

शो संपताच करण आणि तेजस्वी सात फेऱ्या घेतील असे राजीवने पूर्ण दाव्याने सांगितले आहे. राजीवने सांगितले की, ''करण तेजस्वीवर खूप प्रेम करतो. जर त्यांनी लग्न केले नाही तर मी पंडित बनून त्यांचे लग्न लावेन.'' त्यावेळी राजीवला विचारण्यात आले की, 'करण तेजस्वीबाबत इतका सकारात्मक का आहे?' तर यावर राजीव म्हणाला की जर बॉयफ्रेंड पॉझिटिव्ह नसेल तर मग कोण असेल?

करण आणि तेजस्वी बिग बॉस 15 च्या घरात अनेकदा रोमँटिक वागताना दिसले आहेत. त्याचबरोबर या शोमध्ये रश्मी देसाईमुळे करण आणि तेजस्वी यांच्यात भांडणही पाहायला मिळाले होते.

अलीकडील एपिसोडमध्ये, करण आणि तेजस्वी यांच्यात पुन्हा एकदा भांडण झाले, ज्यामध्ये कथित जोडप्याने बिग बॉस 15 च्या घरातील वस्तूंचे नुकसान केले होते.

हेही वाचा - Spider Man On Box Office : स्पायडर मॅनचा बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ, 138. 55 कोटींची विक्रमी कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.