ETV Bharat / sitara

स्वप्नांच्या रेशीम धाग्यांनी विणलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित - gosht eka paithanichi movie release date

'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी हे कलाकार झळकणार आहेत. टीझरमधून पैठणीच्या स्वप्नांची झलक दिसत आहे. त्यामुळे, हा टीझर महिला वर्गाच्या नक्कीच पसंतीला उतरेल यात शंका नाही.

gosht-eka-paithanichi-teaser launched
'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
author img

By

Published : May 12, 2020, 11:36 AM IST

मुंबई - मनात काही स्वप्नं असतात. काही साधी सोपी, तर काही कठीण परीक्षा घेणारी. कधी ही स्वप्नं पूर्ण होतात आणि भरपूर समाधान देतात. तर कधी काही स्वप्नं अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात. पण आशा निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणीसारखा. रंगीत, तलम, मुलायम. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा तरल असा टीझर नुकताच सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला.

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शन या सिनेमाची निर्मिती करत आहेत. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी हे कलाकार झळकणार आहेत.

चित्रपटातील अन्य कलाकार मंडळींची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो. टीझरमधून या पैठणीच्या स्वप्नांची झलक दिसत आहे. त्यामुळे, हा टीझर महिला वर्गाच्या नक्कीच पसंतीला उतरेल यात शंका नाही.

'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाचा टीझर - https://youtu.be/Ig5WXx6LhdA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.