तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता ही अडचणीत सापडली आहे. तिने रविवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यात तिने जातीवाचक आणि अपमानजनक शब्दांचा वापर केल्यामुळे तिच्या विरुध्द हरियाणा राज्यातील हांसीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मला यूट्यबवर यायचे आहे त्यामुळे मला चांगले दिसायचे आहे..***सारखे नाही, असे म्हणताना तिने जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि तिच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली.
नॅशनल अलायन्स फॉर दलित ह्यूमन राईट्सचे संयोजक रजत कालसन यांनी अभिनेत्री मुनमुन दत्तावर एट्रोसिटी कायद्या्ंतर्गत तक्रार दाखल केली आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. त्यामुळे तिला अटक झाल्यास न्यायालय जामीन नाकारु शकते. त्यामुळे मुनमुनला तुरुंगातची हवा खावी लागू शकते.
- — Munmun Dutta (@moonstar4u) May 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— Munmun Dutta (@moonstar4u) May 10, 2021
">— Munmun Dutta (@moonstar4u) May 10, 2021
हे व्हिडिओ प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात आल्यानंतर अभिनेत्री मुनमुन घाबरली आहे. तिने तातडीने झालेल्या प्रकाराबद्दल एक निवेदन प्रसिध्द करुन माफी मागितली आहे. बोलण्याच्या ओघात हा शब्द तोंडून गेला. कुणाच्याही भावना दुखवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे तिने यात म्हटले आहे.
-
Protest in Gujarat against casteist actress @moonstar4u #ArrestMunmunDutta https://t.co/eNpGnYYsRj
— Dilip Mandal (@Profdilipmandal) May 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Protest in Gujarat against casteist actress @moonstar4u #ArrestMunmunDutta https://t.co/eNpGnYYsRj
— Dilip Mandal (@Profdilipmandal) May 10, 2021Protest in Gujarat against casteist actress @moonstar4u #ArrestMunmunDutta https://t.co/eNpGnYYsRj
— Dilip Mandal (@Profdilipmandal) May 10, 2021
तिने दिलगीरी व्यक्त केली असली तरी हा व्हिडिओ अजूनही व्हायरल आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर तीव्र टीका केली आहे. अनेकांनी तिला अटक करावी अशी मागणी केली आहे. तिच्यावर गुन्हा दाखल झाला असल्यामुळे तिला कधीही अटक होऊ शकते.
हेही वाचा - गरजूंच्या मदतीला रस्त्यावर उतरला गायक मिका सिंग