ETV Bharat / sitara

गायिका आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर

"अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायकच्या प्रथम वर्षीय 'स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्य स्तरीय 'आणि 'स्वामी सेवक जिल्हास्तरीय' पुरस्कार वितरण समारंभात गायिका आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०१९' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

गायिका आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर
author img

By

Published : Jul 3, 2019, 7:55 AM IST

मुंबई - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांचा ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून १६ जुलैला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. "अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायकच्या प्रथम वर्षीय 'स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्य स्तरीय 'आणि 'स्वामी सेवक जिल्हास्तरीय' पुरस्कार वितरण समारंभात गायिका आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०१९' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. तर 'स्वामीभूषण राज्य पुरस्कार २०१९' अभिनेता स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ कवी व गीतकार श्री. ना. धों. महानोर यांना देण्यात येणार असून प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

गायिका आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर

२९ जुलै १९८८ला गुरूपौर्णिमेदिवशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे गुरूपौर्णिमा आणि वर्धापन दिन हा उत्सव या संस्थानमध्ये विशेषत्वाने साजरा केला जातो. या खास दिवसाचे औचित्य साधून धर्मकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ६ ते १५ जुलै दरम्यान करण्यात येणार असून यंदाचे हे विसावे वर्ष आहे.

Intro:दिनांक १६ जुलै २०१९ रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले स्मरणार्थ, "अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायकच्या प्रथम वर्षीय 'स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्य स्तरीय 'आणि 'स्वामी सेवक जिल्हास्तरीय' पुरस्कार वितरण समारंभात ख्यातनाम गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०१९' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५ लाख, मानपत्र व सन्मानचिन्ह तर 'स्वामीभूषण राज्य पुरस्कार २०१९' मराठी सिनेअभिनेता स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ कवी व गीतकार श्री. ना. धों. महानोर यांना प्रत्येकी रुपये १ लाख २५ हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. आज मंगेशकर कुटुंबाचे निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.

२९ जुलै १९८८ गुरूपौर्णिमा या दिवशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे श्री गुरूपौर्णिमा आणि वर्धापन दिन हा उत्सव या संस्थानमध्ये विशेषत्वाने आणि भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र संस्थानचा धर्म संकिर्तन कार्यक्रम व गुरूपोर्णिमा / वर्धापन दिन उत्सव सबंध महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या कार्यक्रमात व उत्सवात भाग घेण्यासाठी हजारो परगांवचे स्वामीभक्त आपली हजेरी लावतात.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून धर्मकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ६ जुलै ते १५ जुलै २०१९ दरम्यान करण्यात येणार असून यंदाचे हे विसावे वर्ष आहे.

हे धर्मादाय न्यास अक्कलकोट येथे स्वामी दर्शनास येणाऱ्या हजारो स्वामीभक्तांना अन्नदान (महाप्रसाद :मोफत भोजन)दररोज दोन्ही वेळेस करीत आहे. येथे १५ ते २० हजारावर स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच येणाऱ्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था यात्रीनिवास, यात्रीभुवन येथे केली जाते. हे न्यास सामाजिक बांधिलकी जपत अक्कलकोट शहर विकास कार्यास मोठे योगदान देऊ केले आहे. स्वमालकीच्या विहिरीतून ८ कि.मी. अंतरावरून पाइपलाईनद्वारा पाणी आणून पाणी टंचाईचे काळात सलग ८ महिने दररोज १० लाख लिटर्स पाणी संबंध शहरास पुरवठा केला आहे. हे न्यास गरीब व गरजवंतांना वैधकीय व शैक्षणिक मदत करते. पुरग्रस्त, जळीतग्रस्त, भुकंपग्रस्तांना हे न्यास सदैव मदतीचा हाथ पुढे करते. शैक्षणिक, आरोग्य-विषयक, पर्यावरणपूरक, सांस्कृतिक इ. उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे.

प्रतिवर्षी श्री गुरुपौणिमा उत्सव व वर्धापन दिन उत्साहात साजरा होतो. याचे औचित्य साधून १० दिवसांचे धर्मसंकीर्तन व. सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात. यंदाच्या वर्षी प्रथमच गुरुपौणिमेच्या पार्श्वभूमीवर दि. १५ जुलै २०१९ रोजी सायं. ६ वा. सदरचे राष्ट्रीय व राज्यस्थरीय पुरस्काराचा सन्मान सोहळा अन्नछत्राच्या प्रांगणात अक्कलकोट येथे संपन्न होत आहे.
सदर सभारंभ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट येथे पद्मश्री पंडित ह्रदयनाथ मंगेशकरजींच्या उपस्थितीत पार पडणार असून श्री यतीनजी शहा यांच्या अध्यक्षतेखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व सूत्रसंचालक श्री सुधीर गाडगीळ करणार आहेत.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.