ETV Bharat / sitara

‘मानसिक आरोग्य देखील शारीरिक आरोग्‍याइतकेच महत्त्वाचे आहे’ : सुमित राघवन! - वागले की दुनिया

सध्या कोरोनामय वातावरणामुळे अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या वाढल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब आपल्या मालिकांतूनही दिसू लागलंय. सोनी सब वर सुरु असलेल्या ‘वागले की दुनिया’ मालिकेतील मराठमोळे कुटुंब वागळे यांच्या सामाजिक, कौंटुंबिक समस्या आणि इतर गोष्टींवर विनोदी पद्धतीने भाष्य केले जाते. यावेळी वागळे कुटुंबियांना मोठा धोक्‍याचा सामना करावा लागला आहे.

वागले की दुनिया मालिका
वागले की दुनिया मालिका
author img

By

Published : Feb 4, 2022, 9:26 AM IST

मुंबई - सध्या कोरोनामय वातावरणामुळे अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या वाढल्या आहेत. त्याचे प्रतिबिंब आपल्या मालिकांतूनही दिसू लागलंय. सोनी सब वर सुरु असलेल्या ‘वागले की दुनिया’ मालिकेतील मराठमोळे कुटुंब वागळे यांच्या सामाजिक, कौंटुंबिक समस्या आणि इतर गोष्टींवर विनोदी पद्धतीने भाष्य केले जाते. यावेळी वागळे कुटुंबियांना मोठा धोक्‍याचा सामना करावा लागला आहे. राजेश वागळेला हार्ट अटॅक आला आहे. राजेश वैयक्तिक व कौटुंबिक समस्‍यांचा सामना करत आला आहे. बँक घोटाळा व कार्यालयामधील नवीन भागधारकांसह त्‍याला तणावाचा सामना करताना संघर्ष करावा लागत आहे. तणावात अधिक वाढ झाल्‍याने तो अधिक चिंताग्रस्‍त होतो आणि चक्‍कर येऊन खाली पडतो. ज्‍यामुळे वंदना व वागळे कुटुंब गोंधळून जाते.

राजेश वागळे या हार्ट अटॅकच्‍या स्थितीमधून स्‍वत:ला सावरतो, पण त्‍याचा मेडिक्‍लेम कालबाह्य होतो आणि बँक घोटाळ्यामुळे त्‍याच्‍याकडे इतर कोणताही वैद्यकीय विमा नसतो. राजेश बरा होत नसल्‍यामुळे डॉक्‍टर्स त्‍वरित एन्जिओग्राफी करण्‍याचा सल्‍ला देतात. संपूर्ण कुटुंब निराश होऊन जाते आणि चमत्‍कार घडवून आणण्‍याच्‍या आशेसह साईबाबांकडे प्रार्थना करते. आधीच गोंधळून गेलेल्‍या वंदनाला पैशांच्‍या व्‍यवस्‍थेसंदर्भात संघर्ष करावा लागतो. ती शस्‍त्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेली मोठी रक्‍कम गोळा करण्‍याचा प्रयत्‍न करते. आपल्‍या पतीचे जीवन वाचवण्‍यासाठी ती तिचा हिऱ्यांचा हार ज्‍योतीला विकते. सखी व अथर्व त्‍यांचे सर्वतोपरी योगदान देण्‍याचा प्रयत्‍न करतात, श्रीनिवास मुदत ठेवीमध्‍ये बचत केलेली रक्‍कम देतात.

वागले की दुनिया मालिका
वागले की दुनिया मालिका

हे सर्व घडत असताना वंदनाची मामी ऊर्फ महादेवी त्रिपाठी वागळेंच्या घरी पोहोचते. महादेवी प्रथम डॉक्‍टरांच्‍या निदानाबाबत साशंकता व्यक्त करते. त्यात तिला काहीतरी संशयास्‍पद वाटल्‍याने वंदनाला ‘सेकंड ओपिनियन’ घेण्‍याचा सल्‍ला देते. ती राजेशचा वैद्यकीय अहवाल बघते. अहवाल बघून राजेश व तिला धक्‍का बसतो. ऑक्सिमीटरवरील राजेशच्‍या ऑक्सिजन व पल्‍स रेट रिडिंग्‍ज हॉस्पिटलच्‍या हार्ट मॉनिटरवर दिसणा-या रीडिंगच्‍या तुलनेत वेगळ्या असतात. आता प्रश्न हा आहे की राजेशच्‍या हार्ट अटॅकमागे काही मोठे कटकारस्‍थान असेल का?

राजेश वागळे ची भूमिका साकारणारा सुमीत राघवन म्हणाला, ''आपण संकट न येण्‍याची अपेक्षा करत असतो, पण कधीतरी संकट येतेच. वागळे कुटुंब राजेशच्‍या या अचानक आरोग्‍य संकटामुळे निराश झाले आहे. आम्‍ही प्रत्‍येक एपिसोडमधून सर्वोत्तम संदेश देण्‍याचा नेहमीच प्रयत्‍न करतो. यावेळी देखील आम्‍ही तथ्‍य समोर आणले आहे की, आपल्‍या आरोग्‍यापेक्षा अधिक काहीच महत्त्वाचे नाही आणि मानसिक आरोग्य देखील शारीरिक आरोग्‍याइतकेच महत्त्वाचे आहे. या दोघांमध्‍ये प्रत्‍यक्ष संबंध आहे. तसेच प्रत्‍येकाला आपल्‍या आर्थिक स्थितीबाबत जाणीव असली पाहिजे आणि घोटाळ्यांना बळी पडणार नाही याबाबत दक्षता घेतली पाहिजे. आमची इच्‍छा आहे की, प्रेक्षकांनी राजेशप्रती सहानुभूती दाखवावी. मी सर्वांना या प्रवासादरम्‍यान त्‍याच्‍या पाठिशी राहण्‍याचे आणि 'वागले की दुनिया' पाहत राहण्‍याचे आवाहन करतो.''

हेही वाचा - Sunil Grover Discharged : हृदय शस्त्रक्रियेनंतर सुनील ग्रोव्हरला रुग्णालयातून डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.