मुंबई - लॉकडाऊनच्या काळात शाहरुखची मुलगी सुहाना सतत काहीना काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न करीत असते. यावेळी तिने आपल्या हातावर मेंदी काढली असून त्याचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सुहानाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आपल्या अदाने पोज देत आहे. तिच्या दोन्ही हातावर मेंदी रंगल्याचे फोटोत दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुहानाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक प्रतिक्रिया तिला मिळताना दिसतात.
सुहाना मेकअप करायला शिकल्याचे काही दिवसापूर्वी तिची आई गौरी खान हिने सांगितले होते. याचा फोटोही तिने शेअर केला होता.
गेल्या महिन्यात पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये गौरी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते, ''प्रयोग करीत असताना.''
अलिकडेच अनन्या पांडेने एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ तिची बेस्ट फ्रेंड सुहानाने एडिट केल्याचे अनन्याने लिहिले होते.