मुंबई - लॉकडाऊननंतर नव्या मालिका सुरु झाल्या आणि प्रेक्षकांवर मनोरंजनाचे तुषार उडू लागले. खरंतर अजूनही कोरोना संकट टळलेले नाहीये, त्यामुळे या सगळ्या नव्या मालिकावाल्यांना न्यू नॉर्मलला सामोरं जात, जीव मुठीत धरून चित्रीकरण करावं लागत होतं. मराठी मनोरंजनविश्वात अनेक नव्या मालिका आल्या त्यातीलच एक 'आई माझी काळूबाई' ही मालिका. ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. या मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेतल्या आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.
सोनी मराठी वाहिनीवरची 'आई माझी काळुबाई' ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय व त्या मालिकेची व त्यातील कलाकारांची समाज माध्यमांवर त्याची चर्चा सातत्यानं होताना दिसते. प्रेक्षकांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मालिकेत गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात आणि त्यातील एक म्हणजे ‘महाएपिसोड’. येत्या ७ फेब्रुवारीला ‘आई माझी काळुबाईचा’ महाएपिसोड आहे.
पाटलांच्या घरात कोणीतरी सुरुंग स्फोट घडवण्याचं कारस्थान करतं, पण आर्या मात्र ते कारस्थान हाणून पाडते आणि आर्या काहीतरी करणार असल्याचा अंदाज विराटला येतो. तो आणि पाटील कुटुंब तिच्यावर नजर ठेवू लागतं आणि आर्या घराबाहेर कशी पडणार हा प्रश्न निर्माण होतो. आर्या आता विराट शक्तीला भेदून गावातलं काळुबाईचं देऊळ उघडणार का, हे पाहणं खूप उत्कंठावर्धक असेल.
'आई माझी काळुबाई' चा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
'आई माझी काळुबाई'च्या महाएपिसोडमध्ये काळुबाईच्या देवळाची उत्कंठा वाढवणारी कथा - सोनी मराठी वाहिनीवर ‘आई माझी काळुबाईचा’
सोनी मराठी वाहिनीवर येत्या ७ फेब्रुवारीला ‘आई माझी काळुबाईचा’ महाएपिसोड आहे. यात उत्कंठावर्धक कथानक घडणार असून यामुळे कथेला एक वेगळे वळण मिळू शकेल.