मुंबई - मनोरंजन क्षेत्रात विविध प्रॉडक्शन हाऊसनी पुन्हा चित्रपटांचे आणि वेब सिरीजचे शूटिंग सुरू केले आहे. अशा परिस्थितीत 'कंटेंट क्वीन' एकता कपूरने तिच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'बिच्छू का खेल'चे प्रमोशन सिटी टूरमधून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिव्येंदू, अंशुल चौहान आणि झीशान क्वाद्री अभिनीत ऑल्ट बालाजी आणि झी 5 क्लबचा हा क्राईम थ्रिलर दिवाळीनंतर १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि रिलीज होण्यापूर्वी शोच्या निर्मात्यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसीत खास गंगा आरतीचे आयोजन केले आहे. कोविड साथीच्या दरम्यान शोच्या प्रमोशनसाठी सिटी टूर करणारा हा पहिलाच शो ठरणार आहे.
एका सूत्राने सांगितले की, "बहुतेक शो वाराणसीमध्ये चित्रीत करण्यात आला असल्याने निर्मात्यांनी दशाश्वमेध घाट येथे विशेष गंगा आरती आयोजित करण्याचा निर्णय घेतला. शोच्या निर्मात्यांनी असा विचार केला की शहरातील एक विशेष आरती काम सुरू करण्यासाटी योग्य ठरेल. त्यामुळे त्यांनी आवश्यक परवानग्याही मिळवल्या आहेत आणि अंशूल चौहान आणि झीशान चतुरी यांच्यासह 'बिच्छू का खेल' वेब सिरीजमधील मुख्य पात्र असलेल्या दिव्येंदु शर्माचीही उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या दरम्यान सर्व सुरक्षा प्रोटोकॉल पाळले जातील. "
दिव्येन्दु म्हणाला, "आम्ही बनारसमध्ये 'बिच्छू का खेल' च्या शूटिंगसाठी चांगला वेळ घालवला आहे आणि या पवित्र ठिकाणाला पुन्हा एकदा भेट देण्यास मी उत्सुक आहे."
या मालिकेत मुकुल चड्ढा, गगन आनंद आणि राजेश शर्मा यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकार आहेत.
'बिच्छू का खेल' ही वेब सिरीज या महिन्याच्या १८ तारखेला ऑल्ट बालाजी आणि झी ५ क्लबवर प्रसारित होईल.