कोविड-१९ या जागतिक महामारीच्या आघातानंतर जगभरात पर्यावरणाविषयी अधिक प्रमाणात जागृती निर्माण झालीय. भारतातही पर्यावरणविषयक उपक्रम सुरु असतात. कुठल्याही उपक्रमासोबत सिनेकलाकार जुळला गेला की त्याबद्दलचे संदेश सामान्यजनांपर्यंत सहजतेने पोहोचतात. हे ही तितकंच खरं की अनेक कलाकार प्रामाणिकपणे त्या त्या उपक्रमाशी जोडले गेलेले असतात. आता सोनाक्षी सिन्हाचे उदाहरण घ्या ना. ती वसुंधराप्रेमी असून नुकताच तिला सोनी बीबीसी अर्थकडून ‘अर्थ चॅम्पियन' ने सन्मानित करण्यात आले. संवाद साधल्याने जागरूकता पसरते आणि म्हणूनच सोनाक्षी सिन्हाच्या माध्यमातून सोनी बीबीसी अर्थचा इतरांना या 'अर्थ चॅम्पियन'च्या पावलांवर पाऊल ठेवण्यास आणि त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये शाश्वत निवडी करण्यास प्रोत्साहित करण्याचा मनसुबा आहे.
सोनाक्षी ही निस्सीम वसुंधराप्रेमी आहे. तिला निसर्गामध्ये प्राणी व स्कूबा डायव्हिंगसह वेळ व्यतित करायला आवडते. तिच्या मते, रोजच्या जीवनातील लहान सहान गोष्टी पर्यावरण दीर्घकाळापर्यंत टिकविण्यासाठी सकारात्मक परिणाम करण्यामध्ये उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच तिने तिच्या जीवनात लक्षणीय परिवर्तन केले आहे, जसे प्लास्टिक बॉटल्सचा वापर टाळणे, बांबू टूथब्रशेसचा वापर करणे, सर्वतोपरी पाण्याचे जतन करणे, पर्यावरणास अनुकूल अशा उत्पादनांचा वापर करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती लोकांना देखील ते करू शकणा-या परिवर्तनांबाबत जागरूक करत आहे.
सोनी बीबीसी अर्थ नेहमीच पर्यावरण रक्षण आणि भूमातेची सेवा करणाऱ्यांना ‘हिरो’ चा दर्जा देते आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्या कथांना सादर करते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोनी बीबीसी अर्थ त्यांची अतिथी अभिनेत्री व वसुंधराप्रेमी सोनाक्षी सिन्हाचा सन्मान करत आहेत. सोनाक्षी इन्स्ट्राग्राम लाइव्हच्या माध्यमातून चॅनेलच्या चाहत्यांसोबत संवाद साधणार आहे आणि त्यांना हरित व अधिक शाश्वतपूर्ण भविष्याप्रती कार्य करण्यास प्रोत्साहित करणार आहे.
अभिनेत्री व वसुंधराप्रेमी सोनाक्षी सिन्हा म्हणाली, ''आपण स्वत:हूनच पर्यावरण सुंदर करण्याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या सभोवती असलेल्या सद्यस्थितीने आपल्याला हवामान बदल आणि आपल्या भूमातेवरील त्याच्या परिणामांबाबत विचार करण्यास भाग पाडले आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण सहयोगाने आपल्या रोजच्या नित्यक्रमामध्ये लहानसे परिवर्तन करू शकलो, तर आपण जगण्यासाठी आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती करू शकतो. मला सोनी बीबीसी अर्थच्या 'अर्थ चॅम्पियन्स' उपक्रमाचा भाग असण्याचा आनंद होत आहे. मी इतर समविचारी लोकांना देखील भूमातेची काळजी घेण्याला अधिक प्राधान्य देण्यास आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यामध्ये मदत करण्यास प्रोत्साहित करेन अशी आशा करते.''
५ जून रोजी म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनी सायंकाळी ५ वाजता होस्ट तारा शर्मा आणि #EarthChampion सोनाक्षी सिन्हा यांच्यामधील लाइव्ह संवाद पाहण्यासाठी सोनी बीबीसी अर्थचे इन्स्टाग्राम पेज (@SonyBBCEarth) व्हिझिट करावे लागेल.
हेही वाचा - सिद्धार्थ शुक्लाची 'आदिपुरुष'मध्ये वर्णी? स्वतःचा केला खुलासा...