ETV Bharat / sitara

सर्व लिटिल चॅम्प्सनी बनवली ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या सेटवरील गणपती बाप्पाची मूर्ती

झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात गणेशोत्सव विशेष भाग प्रसारित होणार आहे. त्या भागात पल्लवी जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या रूपात खास पाहुणे येणार आहेत ज्यात पल्लवी, जिने पूर्वी सारेगमप चे सूत्रसंचालन केले आहे, जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे.

author img

By

Published : Sep 9, 2021, 5:34 PM IST

गणपती बाप्पाचं आगमन होतेय आणि छोट्या पडद्यावरील वातावरण पूर्णतः ‘बाप्पामय’ झाल्यासारखे दिसते. झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात गणेशोत्सव विशेष भाग प्रसारित होणार आहे. त्या भागात पल्लवी जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या रूपात खास पाहुणे येणार आहेत ज्यात पल्लवी, जिने पूर्वी सारेगमप चे सूत्रसंचालन केले आहे, जुन्या आठवणींना उजाळा देणार आहे.

'सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या नवीन पर्वाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न देखील मंत्रमुग्ध होतात. येत्या आठवड्यात गणेशोत्सव विशेष भागात काही खास पाहुणे कलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत. हे पाहुणे कलाकार म्हणजे सारेगमप या कार्यक्रमाशी अतूट नातं असलेली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पल्लवी जोशी आणि महाराष्ट्रातातील तमाम संगीतप्रेमींचा आवडता गायक स्वप्नील बांदोडकर.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्सचा गणेशोत्सव विशेष भाग’

हे दोघे या मंचावर आपल्या उपस्थितीने या गणेशोत्सव विशेष भागात बहार आणणार आहेत. पल्लवी जोशी यांचं या कार्यक्रमासोबत एक विशेष नातं आहे. पंचरत्नांच्या पर्वाच सूत्रसंचालन हे पल्लवी जोशी यांनी केलं होतं आणि हीच पंचरत्न या पर्वात परीक्षकांची भूमिका निभावत आहेत. त्यामुळे पल्लवी जोशी या मंचावर आल्याने अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसंच स्वप्नील बांदोडकर देखील या लिटिल चॅम्प्सचं कौतुक करताना दिसणार आहेत. इतकंच नव्हे तर या मंचावर विराजमान झालेले बाप्पा देखील खूप खास आहेत कारण ही श्रींची मूर्ती सर्व लिटिल चॅम्प्सनी मिळून बनवली आहे. बाप्पांचा आशीर्वाद या लिटिल चॅम्प्सच्या पाठीशी सदैव असेलच यात शंका नाही.

पल्लवी जोशी आणि स्वप्नील बांदोडकर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ गणेशोत्सव विशेष भागात हजेरी लावणार असून ‘सारेगमप लिटिल चॅम्प्सचा गणेशोत्सव विशेष भाग’ गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा - 'गणपती अंगणात नाचतो...' गाण्यात झळकले शीतल अहिरराव आणि संचित चौधरी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.