ETV Bharat / sitara

ऐका गायक रोहित राऊतची “वायरलवाली Love Story”! - Viral Love Story Music Video

मराठी तरुणाईचा लाडकर गायक रोहित राऊत त्याच्या हृदयात वाजे समथिंग, हे नाते कोणते अशा सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो आता “वायरलवाली Love Story" घेऊन येत आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर वायरलवाली Love Story हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे.

वायरलवाली Love Story
वायरलवाली Love Story
author img

By

Published : Dec 6, 2021, 7:50 PM IST

आधुनिक काळात आणि खासकरून इंटरनेटच्या जमान्यात सोशल मीडियावर वावरणाऱ्या तरुणाईची एक वेगळी भाषा तयार झालीय तसेच बरेच नवनवीन शब्द सर्रास वापरात आहेत, ज्यात ‘वायरल’ हा शब्द देखील मोडतो. हल्लीच्या गाण्यांतूनही या नव्या शब्दांचा वापर होताना दिसतोय. मराठी तरुणाईचा लाडकर गायक रोहित राऊत त्याच्या हृदयात वाजे समथिंग, हे नाते कोणते अशा सुपरहिट गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो आता “वायरलवाली Love Story" घेऊन येत आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर वायरलवाली Love Story हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सप्तसूर म्युझिक आणि नवसत्य एंटरटेन्मेंट यांनी वायरलवाली Love Story हा म्युझिक व्हिडिओ प्रस्तुत केला आहे. रोहित राऊतला या गाण्यात गायिका सोनाली सोनावणेची साथ लाभली आहे. या दोघांनी "वायरलवाली Love Story" हे धमाकेदार गीत गायलं आहे. सप्तसूर म्युझिकचे "जोडी दोघांची दिसते चिकणी" हे सोनाली सोनावणेचे गाणंही हिट आहे. "वायरलवाली Love Story" म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन नवनाथ निकम यांनी केलं आहे. शालू देवतळे थूल यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. स्वप्नील अर्पेल यांनी छायांकन केलं आहे. तर निधी साळवे आणि आदी मांडवकर ही नवी जोडी या म्युझिक व्हिडिओत झळकली आहे.

गायक रोहित राऊत
गायक रोहित राऊत

रोहित राऊतनं आजपर्यंत अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्याचं प्रत्येक गाणं चाहत्यांना आनंद देणारं असतं. त्यात आता वायरलवाली Love Story या नव्या गाण्याचीही भर पडली आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ पाहता येईल.

गायिका सोनाली सोनावणे
गायिका सोनाली सोनावणे

हेही वाचा - मुंबईची गौरी गोसावी ठरली यावर्षीची ‘सारेगमप लिटिल चॅम्प’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.