मुंबई - गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी नुकताच एका अग्रगण्य पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आपला मुलगा धृव भट्टाचार्य याची कोरोन व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.
मुंबईत राहात असलेल्या धृवमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. परंतु आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे त्याला ही चाचणी घ्यावी लागली होती.
"धृव परदेशात जाण्याचा विचार करीत होता आणि प्रवास करण्यापूर्वी कोरोनाव्हायरसची चाचणी घेण्याचा नियम असल्याने तो ऐच्छिक चाचणीसाठी गेला होता. तो एसिप्टमेटिक आहे. त्याला थोडासा सर्दी आणि खोकला आहे," असे अभिजीत भट्टाचार्य यांनी सांगितले.
धृव भट्टाचार्य सध्या इन-होम क्वारंटाईन आहे. अभिजीत म्हणाले, "त्याने स्वतःला घरीच क्वारंटाईन केले आहे आणि सर्व खबरदारी घेत आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही."
अभिजीत यांनी खुलासा केला की ते सध्या कोलकातामध्ये शूटमध्ये व्यग्र आहेत. सेटवर सहभागी होण्यापूर्वी त्यांना कोव्हिड -१९ ची अनिवार्य चाचणी घ्यावी लागली व ती निगेटिव्ह आली आहे.
हेही वाचा - दुसऱ्यांच्या मुलींना धमक्या का देता? कंगनाच्या टीमचा जावेद अख्तर यांच्यावर हल्ला बोल
"मी कोलकाता येथे शूटिंग करत आहे, असा नियम आहे की कोरोनाव्हायरससाठी तुम्ही नकारात्मक चाचणी केली असेल तरच तुम्ही सेटवर येऊ शकता. म्हणूनच मी निगेटिव्हची चाचणी केली होती आणि मी शूटिंग सुरू ठेवले आहे." असे त्यांनी पुढे सांगितले.
या महिन्याच्या सुरूवातीस, अमिताभ बच्चन, त्यांचा मुलगा अभिषेक आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांची कोरोनव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.