मुंबई - बहुप्रतीक्षित 'मिर्झापूर २' या मालिकेत आक्रमक भूमिकेत अभिनेत्री श्वेता त्रिपाठी दिसणार आहे. यातील तिच्या लूकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
या वेब सिरीजमधील झिरो लूकसाठी तिने काय प्रयत्न केले हे सांगितले आहे. गोलू ही व्यक्तीरेखा ती दुसऱ्या भागातही साकारत आहे. यातील अलिकडे प्रसिध्द झालेल्या फोटोत तिने कुणावर तरी बंदूक रोखल्याचे दिसत आहे.
- View this post on Instagram
भौकाल के लिये तैयार?!! . @yehhaimirzapur @primevideoin @excelmovies #Mirzapur
">
श्वेता म्हणाली, ''या शोमध्ये माझा झिरे मेकअप लूक आहे. मी केवळ चेहऱ्यावर सनस्क्रिन लावून शूटवर जात होते.''
तिने पुढे सांगितले, ''मिर्झापूरचे सलग एक महिन्याचे मोठे शेड्युल होते. पहिल्यांदा आम्ही शॉर्ट हेअर स्टाईलचा विचार केल्यानंतर मी केस कापण्याचा विचार केला. परंतु, दुसऱ्या प्रोजेक्टसाठी हा लूक चालणार नाही, असे लक्षात आल्यानंतर आम्ही विगचा विचार केला. यानंतर गुरू ( दिग्दर्शक ) यांनी मला केस कापण्याचा सल्ला दिला.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आपल्या दिग्दर्शकाचे मत मान्य करून तिने केस कापण्याचा निर्णय घेतला. श्वेता अशा कलाकारांपैकी एक आहे की, दिग्दर्शकाचे म्हणणे ती कधीच पडू देत नाही. म्हणूनच तिच्या या निर्भय अदाकारीचे कौतुक होत आहे.
श्वेता शिवाय 'मिर्झापूर २' या वेब सिरीजमध्ये फजल, पंकज त्रिपाठी आणि रसिका दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.