ETV Bharat / sitara

श्वेता तिवारीच्या मुलीने सोडले मौन, म्हणते - 'आईचा नाही माझा झालाय छळ'! - Palak

श्वेता तिवारीने अलिकडेच आपल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. श्वेताने म्हटले होते की पती अभिनव कोहलीने तिच्या मुलीशी गैरवर्तन केले होते. अलिकडेच श्वेताची मुलगी पलकने आपले मौन सोडत इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे.

पलक तिवारी
author img

By

Published : Aug 13, 2019, 2:43 PM IST

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने अलिकडेच आपल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. श्वेताने म्हटले होते की पती अभिनव कोहलीने तिच्या मुलीशी गैरवर्तन केले होते. अलिकडेच श्वेताची मुलगी पलकने आपले मौन सोडत इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टवर भरपूर कॉमेंट्स येत आहेत. पलकने म्हटलंय की गैरवर्तानाची बळी ती स्वतः ठरली आहे तिची आई नाही.

पलक तिवारीने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिलंय, "तुम्ही सर्वांनी आम्हाला पाठींबा देत सहानुभुती दाखवली त्याबद्दल सर्व प्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद. दुसरं म्हणजे मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मीडियाच्या जवळ कधी वास्तव असते ना कधी असेल. मी पलक तिवारी, अनेकवेळा गैरवर्तनाची बळी ठरली आहे...माझी आई नव्हे. दोन्ही लग्नात माझ्या आईने किती धैर्य दाखवले आणि बंद दरवाजा आड काय घडले हे विसरुन जाणे वाचक म्हणून तुम्हाला शक्य आहे.

"आपण कुणाच्या तरी घराबद्दल लिहित असतो आणि कुणाच्या तरी आयुष्याबद्दल चर्चा करीत असतो. आपल्यातील बहुसंख्य लोक या परिस्थितीतून गेलेले नाहीत त्यामुळे कुठलीतरी चुकीची बातमी वाचून प्रतिमा बनवण्याचा कोणताही अधिकारी नाही."

पलक तिवारी पुढे लिहिते, "माझ्या आईच्या पाठीशी मी नेहमी उभी राहीन. ते एक मजबूत व्यक्ती असून रात्रंदिवस मेहनत करताना मी पाहिलंय. अभिनव कोहलीने माझा कधीच शारिरीक छळ केला नाही. किंवा त्याने मला कधीच चुकीच्या पध्दतीने स्पर्श केला नाही. कुणाबद्दलही अशा गोष्टी पसरवण्या अगोदर ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याची वाचकांनी नेहमी चौकशी केली पाहिजे.

"त्याने काही चुकीच्या गोष्टी बोलला त्या मी आणि माझी आई जाणते. कोणतीही महिला अशा गोष्टी ऐकेल तेव्हा ती भडकणारच. कोणत्याही व्यक्तीकडून जेव्हा स्त्रीच्या सन्मानावर कोणी प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा त्याचे ऐकले जाऊ शकत नाही. आपल्या वडिलांकडून तर नाहीच नाही. मुलगी असल्याचा अभिमान बाळगत सांगते की, मला भेटलेल्या व्यक्तींपैकी माझी आई सन्मानजनक व्यक्ती आहे. माझी आई आत्मनिर्भर आहे, जिला कशाचीही गरज नाही. माझ्या आईने दोन्ही कुटुंबात पुरुषाची भूमिका निभावली आहे."

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.