चेन्नई - अभिनेत्री श्रृती हासनचे सांगितले आहे की, तिचे वडिल कमल हासन तिला कधीही रागावून बोलले नाहीत किंवा त्यांनी कधीही शिक्षा केली नाही.
श्रृतीने आपल्या चाहत्यांसोबत प्रश्न उत्तरे केली. यावेळी एका चाहत्याने तिला विचारले की, वडिलांनी दिलेली शिक्षा काय होती याला उत्तर देताना श्रृती म्हणाली, ''माझ्या वडिलांनी मला कधीच शिक्षा केली नाही, किंवा ते माझ्यावर कधीच रागवलेही नाहीत. ते तसे नाहीत. ते नेहमी लॉजिक आणि कारणाचा उपयोग करतात. परंतु मी एकदा चूक केली होती आणि त्यांनी निराश झाल्याचे म्हटले होते.''
दुसऱ्या एका फॅनने श्रृतीला कमल यांच्याबद्दल विचारले असता ती म्हणाली, ''ते ठिक आहेत. ते चेन्नईत आयसोलेशनमध्ये आहेत.''
आणखी एका फॅनने तिला लॉकडाऊननंतर काय करणार असल्याचे विचारले. त्यावेळी ती म्हणाली, ''जेव्हा सर्व सुरक्षित होईल तेव्हा मी कामाला जायचे पसंत करेन.''
श्रृतीच्या 'गब्बर सिंह' या तेलुगु चित्रपटाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.याबद्दल बोलताना ती म्हणाली, ''या सुपरहिट चित्रपटाचा मी एक भाग होते याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजते. या सिनेमामुळे माझ्यात अनेक बदल घडले.''