इंटरनेटच्या जमान्यात भूतकाळातील कुठली गोष्ट बाहेर येऊन ट्रेंड होईल याचा नेम नाही. त्यातही एखादी गोष्ट ट्रेंड झाली तरी चालते परंतु ट्रोल झाली तर नाहक त्रास होतो. याचा प्रत्यय भारतातील सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिला नुकताच आला. श्रेयाचे शांडिल्य मुखोपाध्याय बरोबर लग्न झालेले असून त्यांना देवयान नावाचा गोड मुलगादेखील आहे. परंतु काल-परवा श्रेयाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला, तेही नेटिझन्सच्या रिकामटेकडेपणामुळे.
त्याच झालं असं की नुकताच अनिवासी भारतीय पराग अग्रवाल (Parag Agrawal)याची ट्विटरच्या सीईओ पदी नेमणूक झाली. आता त्याचा आणि श्रेयाच्या मनस्तापाचा संबंध काय असा प्रश पडू शकतो. पराग अग्रवाल याची ट्विटरच्या सीईओ पदी नेमणूक झाल्याझाल्या नेटकऱ्यांनी त्याचा पूर्वेतिहास खणून काढायला सुरुवात केली आणि त्यांना पराग आणि श्रेयाचे १० वर्ष जुने ट्विटर संभाषण सापडले. मग लगेच चर्चांना उधाण आले. काही असेही सुचवू लागले की पराग आणि श्रेयाची जवळीक होती आणि आता दोघांचे मार्ग वेगवेगळे आहेत. सामान्यतः लोकांना अशा प्रकारच्या गॉसिपमध्ये भाग घ्यायला मजा येते आणि झालेही तसेच.
ट्विटरचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांचे काही जुने ट्विट व्हायरल झाले आहेत. सोशल मीडिया कंपनी ट्विटरने पराग अग्रवाल यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली तेव्हा त्यांच्याबद्दलची चर्चा सुरू झाली. कारण श्रेयाने परागला अभिनंदनस्पद ट्विट केले होते. तेव्हापासून अनेक लोकांनी श्रेया घोषालला ट्विटरवर फॉलो करायला सुरुवात केली आहे. या लोकांनी दशकभर जुने ट्विट उकरून काढून श्रेया आणि पराग यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
पराग अग्रवाल आणि श्रेया घोषाल हे बालपणीचे मित्र आहेत. ही गोष्ट श्रेयाने दहा वर्षांपूर्वी ट्विटरवर सांगितली होती. पण त्यानंतरही लोक तिचे आणि परागचे जुने ट्विट काढून वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. पराग अग्रवालने ३० मे २०११ रोजी केलेल्या ट्विटमध्ये, ज्यात त्याने श्रेया घोषालच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले, "श्रेया घोषाल, मी लॉन्ग ड्राईव्हवर जाताना तुला खूप मिस करतो..... अजून काय चालले आहे?" सुमारे १० वर्षांपूर्वी केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये परागने लिहिले होते की, “श्रेया घोषाल, उत्कृष्ट डीपी. (आयुष्य) कसे चालले आहे?" या सर्वामुळे कुठेतरी या दोघांचे मैत्रीपलीकडेसुद्धा संबंध होते हे सुचविण्याचा प्रयत्न सुरु होता.
परंतु ‘आता खूप झालं’ म्हणत श्रेया घोषालने नेटिझन्सना नम्रपणे फैलावर घेतलं. ‘अरे यार, तुम्ही लोक खूप लहानपणीचे ट्विट काढत आहात. ट्विटर तेव्हा नुकतेच सुरू झाले. १० वर्षांपूर्वी आम्ही लहान होतो आणि मित्र एकमेकांना ट्विट करत नाहीत का? हा काय टाइम पास चालवलाय?’
आता यात महत्वाचं म्हणजे हे ट्विट्स कुणी खोदून काढले आणि पराग सीईओ झाल्यावरच का? काहींच्या मते पब्लिसिटीसाठी त्यानेच हे ट्रेंड केले नसतील कशावरून? त्यातच एका स्त्रीचा, त्यातही विवाहित महिलेचा, अपमान केला जात नाहीये का?
हेही वाचा - सेटवर उशीरा पोहचलेल्या रॅपर बादशाहाला किरण खेरने शिकवला चांगलाच धडा