मुंबई - नुकतीच रीलिज झालेली 'बंदिश बॅन्डिट्स' वेब सीरिज हिट ठरली. या सीरिजमधून नवोदित अभिनेत्री श्रेया चौधरी लोकांच्या चांगलीच स्मरणात राहिली. तिला लोकांनी पसंत केल्यामुळे श्रेया आनंदात आहे.
सीरिजमध्ये एका पॉप स्टारची भूमिका साकारणाऱ्या श्रेयाने सांगितले, ''माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल 'बंदिश बॅन्डिट्स'मुळे आला आहे. यामुळे लोक माझ्या कामामुळे ओळखू लागलेत. माझ्या दिवसाची रोज लोकांच्या मेसेजने होते. प्रशंसा करणाऱ्यांच्या प्रेमाहून मोठा कोणताच पुरस्कार नाही.''
'बंदिश बॅन्डिट्स'मुळे आपले आयुष्य कसे बदलले हे सांगताना श्रेया म्हणाली, " 'बंदिश बॅन्डिट्स'ने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिले. परीक्षेच्या या काळात मला आनंदाचा मोठा स्रोत मिळाला. मालिका पाहून जेव्हा लोक म्हणतात की आम्हाला आनंद झाला तेव्हा मलाही त्याचा आनंद होतो."
श्रेया पुढे म्हणाली, "मला बरीच प्रपोजल येत आहेत आणि आशा आहे की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा भावी प्रकल्पांविषयी बोलू शकेन."
श्रेया चौधरी यापूर्वी इम्तियाज अलीच्या २०१८मध्ये आलेल्या 'द अदर वे' या शॉर्ट फिल्ममध्ये आणि 'बंदिश बॅन्डिट्स' च्या आधी 'डीयर माया' या फिचर फिल्ममध्ये दिसली होती.