मुंबई - सध्या सर्वत्र टिकटॉक या अॅपची क्रेझ पाहायला मिळते. तरुणाईमध्ये तर हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. या अॅपच्या माध्यमातून बरेचजण आपले व्हिडीओ तयार करत असतात. बॉलिवूड सेलेब्रिटी देखील आपले टिकटॉक व्हिडिओ पोस्ट करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. गायिका आर्या आंबेकरने गायलेल्या मराठी गाण्यावर तिने टिकटॉक व्हिडिओ तयार केला आहे.
'सारेगमप' लिटल चॅम्पमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली गायिका आर्या आंबेकर आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. आर्याच्या सुमधूर गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. आर्याने बऱ्याच मालिकांची शीर्षक गीते, चित्रपटातील गाणी गायली आहेत. काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर 'माझा होशील ना' ही नवी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेचेही शीर्षक गीत आर्यानेच गायले आहे. याच गाण्यावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -'बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह', पाहा बिग बींसह अभिषेकचा खास लुक
आर्याने हा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. चक्क शिल्पा शेट्टीने मराठी गाण्यावरचा टिकटॉक व्हिडिओ तयार केल्याने नेटकऱ्यांनीही तिच्या या व्हिडिओची प्रशंसा केली आहे.