मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने तुरुंगातील दोषीचा गणवेश (हिरवी साडी) नेसण्यास सूट मिळावी म्हणून मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयासमोर अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायालयाने भायखळा जेलला उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
इंद्राणी मुखर्जीने आपल्या अर्जात म्हटलंय की, ती या प्रकरणातील तपास अंतर्गत आरोपी असूनही जेल प्रशासन दोषीचा गणवेश घालण्यास सांगत होते. तिच्या अर्जावरील पुढील सुनावणीची तारीख 5 जानेवारी आहे.
२०१२ मध्ये पीटर मुखर्जी आणि अगोदरचा पती संजीव खन्ना यांच्यासह इंद्राणी हिने आर्थिक वादातून शीनाची हत्या केल्याचा आरोप आहे. २०१५ मध्ये तीन वर्षांनंतर कथित गुन्हा उघडकीस आला होता..
ड्रायव्हर श्यामवार रायला ऑगस्ट २०१५ मध्ये दुसऱ्या एका प्रकरणात अटक झाल्यानंतर या हत्या प्रकरणातील इंद्राणीचा कटाचा सहभाग पोलिसांच्या लक्षात आला होता.
हेही वाचा - आयुष्यमान-वाणीने ४८ दिवसात आटोपले 'चंडीगड करे आशिकी'चे शुटिंग
त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली इंद्राणी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हरला अटक केली. हत्येमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली पीटरला नंतर तुरूंगात टाकण्यात आले. पीटर आणि इंद्राणीचा आता घटस्फोट झाला आहे.
हेही वाचा - कुठे आणि कधी होणार सलमान-कॅटरिनाच्या 'टायगर ३' चे शुटिंग