ETV Bharat / sitara

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेने मौलिक शिकवण दिली - अदिती जलतारे

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेत अहिल्याबाई होळकरांची बालपणीची भूमिका करत असलेल्या अदिती जलतारेने देखील ही व्यक्तिरेखा व्यवस्थित समजून घेण्यासाठी विशेष कष्ट घेतले. या मालिकेतून मी खूप काही शिकले आहे आणि दररोज एक नवी शिकवण मला मिळते, असे ती म्हणते.

अहिल्याबाई
अहिल्याबाई
author img

By

Published : Jul 2, 2021, 8:41 PM IST

Updated : Sep 11, 2021, 5:22 PM IST

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका १८ व्या शतकातील कहाणी सांगते. काळाच्या पुढे विचार असलेल्या मुलीला, अहिल्याबाई ला, तिचे सासरे मल्हार राव सतत समर्थन देत राहतात. त्यावेळी असलेल्या पितृसत्ताक समाजात महिलांसाठी शिक्षण वर्जित होते. पण महिलांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या विरोधात अहिल्याबाई एक दुर्लभ आणि अनुकरणीय उदाहरण म्हणून उभी राहिली. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पुण्यश्लोक अहिल्याबाई या भव्य मालिकेत अहिल्याबाई होळकर चे जीवन चरित्र मांडले आहे. अहिल्याबाई होळकर एक अशी स्त्री होती जिच्यात स्त्रीचे सामर्थ्य आणि धैर्य एकवटले होते. तिने १८व्या शतकात सर्व प्रतिकूलतांवर मात करून केवळ इतिहासच घडवला नाही तर येणार्‍या अनेक पिढ्यांसाठी ती प्रेरणास्रोत बनली.

कुठलीही भूमिका निभावताना कलाकार त्यातून काहीतरी शिकत असतो. बरेचसे अभिनेते, जे मेथड ॲक्टिंगची कास धरतात, भूमिकेतील पात्रांसारखेच अनुभव अनुभवण्याचा प्रयत्न करीत असतात. पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेतील अभिनेते हे वारंवार सांगत असतात की, या मालिकेने त्यांचे आयुष्यच पालटून टाकले आहे आणि या मालिकेने त्यांना अत्यंत मौलिक शिकवण दिली आहे. कलाकारांची आपल्या भूमिकेसाठी तयारी करण्याची आपापली खास पद्धत असते.

या मालिकेत अहिल्याबाई होळकरांची बालपणीची भूमिका करत असलेल्या अदिती जलतारेने देखील ही व्यक्तिरेखा व्यवस्थित समजून घेण्यासाठी विशेष कष्ट घेतले. वट पौर्णिमेच्या एका महत्त्वाच्या भागात अदितीने केवळ ती दृश्ये चित्रित केली नाहीत तर, वट पौर्णिमेचे महत्त्व आणि त्याची लक्षणीयता समजून घेण्याचाही प्रयत्न केला. सेटवर ती सगळ्यात लहान असली तरी आपल्या काम करण्याच्या निष्ठेने आणि गोष्टी समजून घेण्याच्या आपल्या जिज्ञासू वृत्तीने ती सगळ्यांना चकित करते.

याविषयी अधिक बोलताना अदिती जलतारे म्हणाली, “या मालिकेतून मी खूप काही शिकले आहे आणि दररोज एक नवी शिकवण मला मिळते. आम्ही जेव्हा वट पौर्णिमेच्या दृश्याचे शूटिंग करत होतो, तेव्हा मला असे वाटले की, जर मला वट पौर्णिमेचे महत्त्व माहीत असेल, तर मी त्या दृश्याला अधिक चांगला न्याय देऊ शकेन. मला वाटते, प्रेक्षकांनी मला खूप खुल्या दिलाने स्वीकारले आहे,आणि मी त्यांचे देणे लागते. मी बर्‍याच मराठी बायकांना वट पौर्णिमेचे व्रत करताना पाहिले आहे. पण मला त्याबद्दल रीतसर माहिती नव्हती. सेटवरच्या सगळ्या मंडळींनी मला वट पौर्णिमेचे महत्त्व समजावून सांगितले, त्यामुळे मी ते सीन्स चांगल्यारितीने करू शकले आणि त्याबद्दल मी त्या सर्वांची ऋणी आहे.”

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होते.

Last Updated : Sep 11, 2021, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.