ETV Bharat / sitara

‘पिंजरा खुबसूरती का' मालिकेने ओलांडला २०० एपिसोड्सचा टप्‍पा! - 'पिंजरा खुबसूरती का' मालिका लोकप्रिय

'पिंजरा खुबसूरती का' या टीव्ही मालिकेची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. रंजक वळणावर आलेल्या या मालिकेने नुकताच २०० एपिसोडेसचा टप्पा ओलांडला आहे.

series-pinjra-khubsurati-
‘पिंजरा खुबसूरती का'
author img

By

Published : Jun 12, 2021, 9:26 PM IST

पुरुषाला बाह्यसौंदर्य आकर्षित करते की आंतरसौंदर्य यावर उहापोह सध्या कलर्सवरील मालिका 'पिंजरा खुबसूरती का' या मालिकेत केला जातोय. हाताची पाचही बोटे सारखी नसतात त्यामुळे सौंदर्याची व्याख्या ठरविणे थोडे अवघड आहे. परंतु या मालिकेत कुठलीही बाजू न घेता विचार मांडण्यात आले आहेत आणि त्यामुळेच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि नुकतेच तिने २०० भागांचा टप्पा ओलांडला.

‘पिंजरा खुबसूरती का' या मालिकेत मयुरा व ओमकारचा, ज्यांच्या भूमिका करताहेत रिया शर्मा आणि साहिल उप्‍पल, अनोखा जीवनप्रवास सुरूच राहिलेला असून यात मयुराच्‍या जीवनप्रवासाला तपशीलवारपणे दर्शविले आहे. बाहेरील सौंदर्याकडे आकर्षिलेल्‍या ओमकारला भेटल्‍यानंतर तिचे जीवनच बदलून जाते. ती कशाप्रकारे या परिस्थितीचा सामना करते आणि बाह्यसौंदर्याप्रती आकर्षिलेल्‍या पतीला देखील कशाप्रकारे बदलते हे या मालिकेमध्‍ये पाहायला मिळते.

या खासप्रसंगाबाबत बोलताना ओमकारची भूमिका साकारणारा साहिल म्‍हणाला, ''ओमकार ही भूमिका अत्‍यंत जटिल आहे आणि त्‍याचा सौंदर्याकडे पाहण्‍याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मला आनंद होत आहे की, 'पिंजरा खुबसूरती का'ने हा टप्‍पा गाठला आहे. ही मालिका सर्वोत्तम असण्‍यासोबत अधिकाधिक प्रबळ होत आहे. मी या मालिकेचा भाग असल्‍यामुळे स्‍वत:ला भाग्‍यवान समजतो. निर्मात्‍यांनी नेहमीच काहीतरी नवीन व रोमांचक घडण्‍याची खात्री घेतली आहे आणि यामुळेच आम्‍ही हा सुवर्ण टप्‍पा गाठला आहे. मी अथक मेहनत घेत राहीन आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहीन.”

२०० एपिसोड्सचा टप्‍पा गाठण्‍याबाबत बोलताना मयुराची भूमिका साकारणारी रिया शर्मा म्‍हणाली, ''मालिका व माझी भूमिका मयुराला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम व प्रशंसेने माझ्या मनात खास स्‍थान निर्माण केले आहे. २०० एपिसोड्सचा टप्‍पा गाठणे हे प्रभावी यश आहे आणि आम्‍ही हा टप्‍पा गाठल्‍याचा मला खूप आनंद होत आहे. असे असले तरी मला वाटते की, ही फक्‍त सुरूवात आहे. मयुरा व ओमकारच्‍या जीवनामध्‍ये अनेक आव्‍हाने येणार आहेत.''

‘पिंजरा खुबसूरती का' या मालिकेत यापुढेही मनोरंजनपूर्ण व नाट्यमय ट्विस्‍ट्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. आता प्रेक्षकांना अधिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. मयुरावर एकतर्फी प्रेम करणारा राघव शास्‍त्री, जो पोलीस डिपार्टमेंटमध्ये एसीपी आहे, यांची आणि मयुराची भेट घडणार आहे त्यामुळे मालिका वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.

'पिंजरा खुबसूरती का' ही मालिका कलर्स वाहिनीवर प्रसारित होते.

हेही वाचा -प्रेम प्रकरण चव्हाट्यावर आणल्यामुळे हर्षवर्धनवर कॅटरिना कैफ नाराज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.