ETV Bharat / sitara

‘मन उडु उडु झालं’ मालिका मनोरंजसोबत देतेय सामाजिक संदेश सुद्धा!

author img

By

Published : Nov 6, 2021, 9:52 PM IST

टीव्ही मालिका मन उडु उडु झालं ने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. दिवाळी सणाचा उत्साह सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. मालिकेत देखील हा सण साजरा होताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण सामाजिक भान राखत या मालिकेने एक चांगला संदेश मागील भागात दिला.

‘मन उडु उडु झालं’
‘मन उडु उडु झालं’

सध्या जगभरात पर्यावरण हा विषय खूप गांभीर्याने चर्चिला जातोय. पर्यावरण रक्षणाची प्रत्येकाचीच जबाबदारी असून टेलिव्हिजन मालिकाही याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसताहेत. त्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतानाच सामाजिक बांधिलकीही जपताहेत. दिवाळी म्हटलं की फटाके आले आणि फटाके म्हणजे प्रदूषण आणि अशुद्ध हवेला निमंत्रणच. शुद्ध हवा मिळणं हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. दिवाळी किंवा कुठल्याही प्रसंगी फटाके फोडणे हे घातकच असते. त्यामुळे हवेत खूप प्रदूषण होतं.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

झी मराठीवरील मालिका मन उडु उडु झालं ने लोकप्रियतेच शिखर गाठलं आहे. दिवाळी सणाचा उत्साह सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. मालिकेत देखील हा सण साजरा होताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण सामाजिक भान राखत या मालिकेने एक चांगला संदेश मागील भागात दिला. देशपांडे कुटुंबीय फटाके न फोडता फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी आपण रोप लावायची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे असा संदेश देताना दिसले.

हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी मन उडु उडु झालं मालिकेत देशपांडे सर घरी कोरफड, जरबेरा आणि नाग वनस्पती आणतात. ही रोप हवेतील प्रदूषण शोषून घेतात. माणूस म्हणून आपण निसर्गाला काहीतरी देणं लागतो आणि म्हणूनच देशपांडे कुटुंबीय फटाके न फोडता आपल्या घरात हि रोप लावतात. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात हि आपण आपल्यापासून केली पाहिजे. त्यामुळे फटाके फोडू नका आणि फटाक्यांमुळे होणार प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी झाडं लावा असा चांगला संदेश मालिकेतून देण्यात आला आहे.

आपल्या लाडक्या कलाकारांना चाहते आणि रसिक नेहमी प्रेक्षक फॉलो करत असतात त्यामुळे मन उडु उडु झालं या मालिकेत दिलेला चांगला संदेश सुद्धा ते आचरणात आणतील अशी आशा व्यक्त केलीय या मालिकेच्या टीमने.

हेही वाचा - निर्माते दिपक राणे यांच्या आगामी मराठी चित्रपटात दाक्षिणात्य कलाकारांची वर्णी!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.