अहमदनगर (संगमनेर) - ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं संगमनेरमध्ये निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या त्या मातोश्री आहेत. अलिकडेच रघुवीर खेडकर यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यातील काही जणांना काल घरी सोडण्यात आले होते.
२००५ मध्ये महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. चंदिगड येथे संगीत नाटक अकादमी, मुंबई विद्यापीठ येथेही त्यांनी तमाशा सादर केला आहे.