ETV Bharat / sitara

संजय जाधव आणि सोनाली कुलकर्णी सादर करताहेत संगीतप्रधान 'तमाशा लाईव्ह'!

‘दुनियादारी’ फेम संजय जाधव आणि ‘नटरंग’ फेम सोनाली कुलकर्णी एकत्र आले असून त्यांचा नवीन चित्रपट 'तमाशा लाईव्ह' येऊ घातलाय. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

author img

By

Published : Aug 10, 2021, 1:10 PM IST

tamasha live
'तमाशा लाईव्ह'

मुंबई - कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा कहर कमी झाला, आणि त्यामुळे मनोरंजनसृष्टी पुन्हा सावरू लागलीय. इतक्या महिन्यांच्या ब्रेकनंतर आता अनेक मराठी चित्रपटांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. ‘दुनियादारी’ फेम संजय जाधव आणि ‘नटरंग’ फेम सोनाली कुलकर्णी एकत्र आले असून त्यांचा नवीन चित्रपट 'तमाशा लाईव्ह' येऊ घातलाय. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

sonali kulkarni
सोनाली कुलकर्णी
या चित्रपटाबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ''संजय जाधव सोबत मी 'अनुराधा' करत आहे. सोनालीसोबत मी 'हाकामारी' करत आहे. संजय जाधव आणि सोनाली कुलकर्णी हे दोघेही आपापल्या विभागात एकदम अव्वल आहेत. आणि आता 'तमाशा लाईव्ह'च्या निमित्ताने या दोघांसोबत एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. संगीतमय चित्रपट आम्हीसुद्धा पहिल्यांदाच करत आहोत. त्यामुळे आमची पण उत्सुकता तेवढीच आहे. विषय वेगळा असल्याने प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.'' 'तमाशा लाईव्ह' विषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ''मुळात सोनाली माझी खूप चांगली मैत्रीण आहे. परंतु आम्ही प्रथमच एकत्र काम करत आहोत. हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. तर कोरिओग्राफी उमेश जाधव यांची आहे. एकंदरच चित्रपटाची टीम एकदम भन्नाट आहे. या प्रोजेक्टबाबत मी खूपच उत्सुक आहे.''
sanjay jadhav
संजय जाधव
संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी हिची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून पटकथा संजय जाधव यांची आहे. तर संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग 'तमाशा लाईव्ह'चे निर्माता आहेत. पोस्टरवरून हा चित्रपट संगीतावर आधारित असल्याचे कळतेय. मात्र या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार, यासाठी दिवाळी २०२२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा - अभिनेत्री सरन्या शशी हिने 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.