ETV Bharat / sitara

बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत इंडियन आयडॉलमध्ये रंगणार ‘सांगीतिक रामायण-कथन’! - इंडियन आयडॉलमध्ये रंगणार ‘सांगीतिक रामायण-कथन

इंडियन आयडॉल १२मधील गायक स्पर्धक रामायण कथन करणार आहेत. हे निरूपण सांगीतिक असेल आणि त्याने रामनवमीचा भाग अधिक विशेष बनेल. त्यात या भागाला चार चाँद लावण्यासाठी बाबा रामदेव यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे

Idol in the presence of Baba Ramdev
बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत इंडियन आयडॉल
author img

By

Published : Apr 15, 2021, 3:52 PM IST

सोनी वाहिनीवरील इंडियन आयडॉल १२ मधील गायक स्पर्धक अत्युच्य पातळीची गायकी पेश करीत परीक्षकांबरोबरच कार्यक्रमात येणाऱ्या विविध सेलेब्रिटी पाहुण्यांनाही चकित करीत आहेत. परंतु या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलचा मंच आजवर कधी झाला नसेल, इतका आध्यात्मिक आणि मनःशांती प्रदान करणारा असेल, कारण स्पर्धक राष्ट्रीय टेलिव्हिजनवर रामायण कथन करणार आहेत. हे निरूपण सांगीतिक असेल आणि त्याने रामनवमीचा भाग अधिक विशेष बनेल. त्यात या भागाला चार चाँद लावण्यासाठी बाबा रामदेव यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे. बाबा रामदेव त्यांच्या संन्यासाबद्दलची गोष्टसुद्धा या भागात कथन करतील.

रामनवमीच्या मंगल प्रसंगी, इंडियन आयडॉलचे स्पर्धक काही सुमधुर गाणी म्हणणार आहेत, जी ऐकून सगळे परीक्षक भक्तीत लीन होऊन जातील आणि सेटवर उपस्थित सगळ्यांनाच मनःशांतीचा अनुभव मिळेल. योग गुरु देखील स्पर्धकांच्या गोड गळ्याच्या गायकीचा आस्वाद घेताना दिसले. इतकेच नाही, तर त्यांनी हे देखील उघड केले की, रामनवमीच्या दिवशीच त्यांनी जीवनातील ऐहिक सुखांचा त्याग करून संन्यास घेण्याचे ठरवले होते.

बाबा रामदेव म्हणाले, “२७ वर्षांपूर्वी रामनवमीच्या दिवशी मी माझे जीवन साधेपणाने जगण्याचे आणि जीवनातील सुख-सुविधांचा त्याग करण्याचे ठरवले. माझ्या मनात रामनवमीचे विशेष स्थान आहे कारण याच दिवशी माझा जणू नवा जन्म झाला आणि मी साधे आणि सात्विक जीवन जगू लागलो. आज मी इंडियन आयडॉलच्या सगळ्या स्पर्धकांना आशीर्वाद देत आहे कारण त्यांच्या गाण्यातील मधुरतेने माझ्या अंगावर शहारा आला. त्यांचे आवाज इतके गोड आहेत की ब्रह्मांडाची सफर झाल्यागत वाटतंय. तुम्हा सर्वांना मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”

इंडियन आयडॉल हा गाम्यांचा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो.

हेही वाचा - टकाटक’ च्या सिक्वेलच्या शूटिंगला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाली सुरूवात!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.