ETV Bharat / sitara

समीर विध्वंस दिग्दर्शित 'समांतर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! - स्वप्नील जोशी

स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. सिझन १ मध्ये स्वप्नील जोशीने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती.

'समांतर २'
'समांतर २'
author img

By

Published : Jun 18, 2021, 8:09 AM IST

मुंबई - सध्या वेब सिरीजचा बोलबाला आहे. मराठीतही वेब सिरीज बनत असून अनेक आशयघन विषयांवरील मालिका डिजिटल विश्वात येत आहेत. सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित, स्वप्नील जोशी अभिनित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘समांतर’ ही वेब सिरीज प्रचंड गाजली. साहजिकच त्याचा आता दुसरा सिझन येतोय, ‘समांतर २’, जो दिग्दर्शित केलाय समीर विध्वंस याने.

समांतर
समांतर
स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. सिझन १ मध्ये स्वप्नील जोशीने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती.
swapnil joshi
swapnil joshi
सीरिजच्या शेवटाला कुमारचे भविष्य स्पष्ट दिसत होते. त्यामुळे साहजिकच समीर विध्वंस दिग्दर्शित 'समांतर २' ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती, ती यात आता पुढे काय पाहायला मिळणार याची. ही उत्सुकता अधिक न ताणता एमएक्स प्लेअरने 'समांतर २'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल की नाही हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहावी लागेल.मराठी एमएक्स ओरिजिनल 'समांतर २'चा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - शेफाली शहाचा ‘सम-डे’ जर्मनीतील स्टटगार्टच्या १८ व्या भारतीय चित्रपट महोत्सवात झाला सामील!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.