ETV Bharat / sitara

सलमानच्या 'भारत'ने चारच दिवसात कमावला शंभर कोटीचा गल्ला, रचला 'हा' रेकॉर्ड - ali abbas jafar

'ईद'च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करुन यावर्षीचा बिगेस्ट ओपनर ठरलेल्या या चित्रपटाने चारच दिवसात शंभर कोटीचा आकडा पार केला आहे.

सलमानच्या 'भारत'ने चारच दिवसात कमावला शंभर कोटीचा गल्ला, रचला 'हा' रेकॉर्ड
author img

By

Published : Jun 9, 2019, 12:55 PM IST

मुंबई - 'टायगर जिंदा है' चित्रपटाच्या दोन वर्षानंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफची जादु पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत तिसऱ्यांदा एकत्र येत या दोघांचीही जोडी पुन्हा एकदा हिट ठरली आहे. 'ईद'च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करुन यावर्षीचा बिगेस्ट ओपनर ठरलेल्या या चित्रपटाने चारच दिवसात शंभर कोटीचा आकडा पार केला आहे.

'भारत'ने आत्तापर्यंत १३० कोटीचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाद्वारे सलमान खान हा सर्वाधिक शंभर कोटी गल्ला जमवणाऱ्या चित्रपटाच्या यादीत अव्वल ठरला आहे. त्याच्या आत्तापर्यंत १४ चित्रपटांनी शंभर कोटीची कमाई केली आहे. त्यापैकी ३ चित्रपट हे ३०० कोटी तर, २ चित्रपट हे २०० कोटींचा गल्ला जमवणारे आहेत.

आठवड्याच्या शेवटपर्यंत 'भारत' देखील १५० कोटीचा आकडा गाठेल, असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केला आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमुळेही चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

'भारत' चित्रपट तब्बल ४७०० स्क्रन्सवर झळकला आहे. या चित्रपटात सलमान खान, कॅटरिना कैफ यांच्याव्यतीरिक्त दिशा पटाणी, तब्बु, सोनाली कुलकर्णी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर यांचाही समावेश आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.