ETV Bharat / sitara

'नच बलिये'च्या नवव्या पर्वात सलमान खानदेखील घेणार धमाकेदार एन्ट्री - promo

सलमान खाननेच यावेळी या शोची निर्मिती केली आहे. त्यामुळे सलमान खान या कार्यक्रमात काय धमाल करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस'नंतर आता 'नच बलिये'मध्येही तो दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाचीही आतुरता प्रेक्षकांना लागली आहे.

'नच बलिये'च्या नवव्या पर्वात सलमान खानदेखील घेणार धमाकेदार एन्ट्री
author img

By

Published : Jul 14, 2019, 5:34 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो 'नच बलिये'चे नववे पर्व सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. यावेळी या कार्यक्रमाची थिम नेहमीपेक्षा पूर्णत: वेगळी आहे. कारण, यावेळी या कार्यक्रमात एक्स कपल एकमेकांसोबत थिरकताना दिसणार आहेत. तसेच आणखी एक आकर्षण असणार ते म्हणजे सलमान खान. होय, सलमान खानदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. नुकताच त्याचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

सलमान खान या कार्यक्रमात धमाकेदार एन्ट्री घेणार असल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते. मात्र, तो नेमका कोणासोबत या कार्यक्रमात सहभागी होणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. प्रोमोमध्ये नेहमीप्रमाणे सलमान खानची रॉकिंग झलकही पाहायला मिळते.

सलमान खाननेच यावेळी या शोची निर्मिती केली आहे. त्यामुळे सलमान खान या कार्यक्रमात काय धमाल करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'बिग बॉस'नंतर आता 'नच बलिये'मध्येही तो दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाचीही आतुरता प्रेक्षकांना लागली आहे.

मनिष पॉल या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणार आहे. तर, रविना टंडन, अली अब्बास जफर हे कार्यक्रमाचे परिक्षण करणार आहेत. आता सलमानच्या एन्ट्रीला या शोला चार चांद लागतील, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.