मुंबई - सर्वच रियालिटी शोजमध्ये सर्व क्षेत्रातील सेलिब्रिटींना पाहुणे म्हणून बोलाविण्यात येते आणि त्यांच्या अनुभवांचा फायदा स्पर्धकांना होत असतो. सारेगमप लिटिल चॅम्प्स हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत.
प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट परफॉर्मन्सने सगळ्यांना थक्क करतात. यातील काही स्पर्धकांनी या मंचाला निरोपही दिला. या आठवड्यात दिवाळी विशेष भागात या स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी मंचावर लोकप्रिय गायिका महालक्ष्मी अय्यर आणि कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी हजेरी लावली. उज्वल निकम यांनी या सर्व स्पर्धकांच्या गाण्याचा आनंद लुटला. इतकंच नव्हे तर या मंचावर आल्यावर महालक्ष्मी अय्यर यांना देखील गाण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे महालक्ष्मी यांच्या आवाजातील सुमधुर गाणं देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळाले.
निकम आणि महालक्ष्मी यांच्या उपस्थितीत सगळे लिटिल चॅम्प्सनी खूप धमाल केली. सर्व लिटिल चॅम्प्सने एकमेकांनी आधी सादर केलेली गाणी गायली.
कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम आणि ज्येष्ठ गायिका महालक्ष्मी अय्यर यांनी लावली हजेरी सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या मंचावर! - सारेगमप
सारेगमप लिटिल चॅम्प्स हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. या आठवड्यात दिवाळी विशेष भागात या स्पर्धकांचं कौतुक करण्यासाठी मंचावर लोकप्रिय गायिका महालक्ष्मी अय्यर आणि कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी हजेरी लावली.