ETV Bharat / sitara

VIDEO : रुबीना दिलैकने घेतले नवे चॅलेंज, पाईपवरुन केला ओढा पार - VIDEO : रुबीना दिलैकने घेतले नवे चॅलेंज

रुबीना दिलैकने नुकताच तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती पाईपवर चढून ओञा ओलांडत आहे. यावेळी ती खूप घाबरलेली दिसत असून अखेर संतुलीत राहून ती हा ओढा पार करताना दिसते.

रुबीना दिलैकने घेतले नवे चॅलेंज
रुबीना दिलैकने घेतले नवे चॅलेंज
author img

By

Published : Aug 14, 2021, 10:48 PM IST

हैदराबाद - प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस 14' ची विजेती रुबिना दिलैक सध्या खूप चर्चेत आहे. रुबीना सतत सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे कधी नृत्याचे व्हिडिओ तर कधी बोल्ड फोटोशूट रुबीनाला नेहमी चर्चेत ठेवत असते.

रुबिनाने मधूनच असे फोटो पाठवले आहेत की ते पाहून चाहत्यांचे चेहरे फुलले आहेत. रुबीना दिलैक देखील तिचा प्रत्येक उपक्रम चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रुबीना दिलैक अनेकदा नवीन आव्हाने स्वीकारत असते. अलीकडेच रुबीनाने आणखी एक आव्हान स्वीकारले आहे, ज्याचा व्हिडिओ तिने इन्स्टावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसू शकते की, रुबीना दिलैक पाईपवर चढून ओढा ओलांडत आहे. ती खूप घाबरलेली दिसत असली तरी ती सहज नाला ओलांडते. या व्हिडिओसोबत तिने 'मारा मारा ... रामा रामा ... मारा मारा' असे एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. यावर चाहतेही मोठ्या आनंदाने कमेंट करत आहेत. एका चाहत्याने 'वाह ओह माय गॉड', दुसऱ्याने 'बॅलेंसिंग पॉवर' असे लिहिले आहे. रुबीनाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतो आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल रुबीना 'शक्ती-अस्तित्व के एहसास की' या मालिकेत सौम्याची भूमिका साकारत आहे. एवढेच नाही तर ती लवकरच हितेन तेजवानी आणि राजपाल यादवसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर पती अभिनवसोबत तिचा 'तुमसे प्यार है' हा म्युझिक व्हिडिओही रिलीज झाला आहे, जो चांगलाच पसंत केला जात आहे.

अलीकडेच रुबीना दिलैकने इन्स्टाग्रामवर समुद्रकिनारी स्विमिंग सूटचे फोटो शेअर केले आहेत. रुबिनाचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांची मनं खूष झाली आहेत. या फोटोमध्ये रुबीना पती अभिनव शुक्लासोबत दिसली.

हेही वाचा - अनिल कपूरची लेक रिया कपूरचे आज लग्न, जाणून घ्या कोण आहे नवरदेव?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.