ETV Bharat / sitara

'खतरों के खिलाडी ११' च्या प्रोमोत रोहित शेट्टीची चित्त्यासोबत धमाकेदार एन्ट्री! - दिव्‍यांका त्रिपाठी

अभूतपूर्व रोमांच, साहसी व धाडसी कृत्‍ये हे 'खतरों के खिलाडी’चे वैशिष्ट्य आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ॲक्शन्ड-पॅक्ड प्रोमोमध्‍ये ॲक्शन-मास्‍टर रोहित शेट्टीने या शोच्‍या शुभारंभाचे संकेत दिले आहे. केपटाऊनमधील नयनरम्‍य ठिकाणांवर हे धोकादायक खेळ खेळले जाणार आहेत. दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटीज या शोचा हिस्सा होत असतात आणि यावेळीही नावाजलेले स्पर्धक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. यातील १३ साहसी स्पर्धक-योद्धे खंबीरपणे त्‍यांच्‍या भयावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

'खतरों के खिलाडी ११' च्या प्रोमोत रोहित शेट्टीची चित्त्यासोबत धमाकेदार एन्ट्री!

author img

By

Published : Jun 19, 2021, 9:26 AM IST

Updated : Jun 19, 2021, 11:58 AM IST

मुंबई - अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचा दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी कलर्सवरील 'खतरों के खिलाडी’ चे सूत्रसंचालन करतो. त्याला स्वतःला ॲक्शन बॅकग्राउंड आहे (त्याचे आई-वडील दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध ॲक्शन डिरेक्टर राहिले आहेत) आणि त्याच्याबद्दल स्पर्धकांमध्ये भीतीयुक्त आदरही आहे. बॉलिवूडमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेला रोहित शेट्टी 'खतरों के खिलाडी’ मधील बरेचसे स्टंट्स स्वतः करून बघतो त्यामुळे त्याच्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो. आता हा ॲक्शन-मास्टर पुन्हा एकदा घेऊन आलाय थरारक मनोरंजन 'खतरों के खिलाडी’ च्या ११ व्या पर्वातून.

अभूतपूर्व रोमांच, साहसी व धाडसी कृत्‍ये हे 'खतरों के खिलाडी’चे वैशिष्ट्य आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ॲक्शन्ड-पॅक्ड प्रोमोमध्‍ये ॲक्शन-मास्‍टर रोहित शेट्टीने या शोच्‍या शुभारंभाचे संकेत दिले आहे. केपटाऊनमधील नयनरम्‍य ठिकाणांवर हे धोकादायक खेळ खेळले जाणार आहेत. दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटीज या शोचा हिस्सा होत असतात आणि यावेळीही नावाजलेले स्पर्धक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. यातील १३ साहसी स्पर्धक-योद्धे खंबीरपणे त्‍यांच्‍या भयावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. शोची यावेळची टॅगलाईन आहे ‘डर वि डेअर’ (Darr vs Dare). 'डर और डेअर का बॅटलग्राऊण्‍ड, वेलकम टू केपटाऊन' थीम असलेल्‍या या नवीन पर्वामध्‍ये काही अभूतपूर्व साहसी स्‍टण्‍ट्स आणि स्पर्धकांच्या भयाचा सामना करण्‍याची हिंमत पाहायला मिळणार आहे.

'खतरों के खिलाडी ११' च्या प्रोमोत रोहित शेट्टीची चित्त्यासोबत धमाकेदार एन्ट्री..

'खतरों के खिलाडी’ च्‍या ११ व्या पर्वाच्या प्रोमोमध्‍ये संचालक रोहित शेट्टी एका जीपमधून चित्त्यासोबत धमाकेदार एन्ट्री करताना पाहायला मिळत आहे. नवीन पर्वाचा इशारा देत रोहित म्हणतोय, 'यहाँ कदम कदम पे बढेगा डर और डेअर के वॉरिअर्स देंगे उसे कडी टक्‍कर. ये है डर और डेअर का बॅटलग्राऊण्‍ड, वेलकम टू केपटाऊन'.

यंदाच्‍या पर्वामध्‍ये स्‍पर्धकांच्‍या ब्रिगेडमध्‍ये अर्जुन बिजलानी, राहुल वैद्य, अभिनव शुक्‍ला, दिव्‍यांका त्रिपाठी, आस्‍था गिल, सौरभ राज जैन, महक चहल, अनुष्‍का सेन, श्‍वेता तिवारी, साना मकबुल, विशाल आदित्‍य सिंग, वरूण सूद आणि निक्‍की तांबोळी (तंबोली) हे कलाकार सामील होणार आहेत.

Last Updated : Jun 19, 2021, 11:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.