मुंबई - बॉलिवूडवचे शोमॅन, अशी ओळख असलेल्या राज कपूर यांची आज ३१ वी पुण्यतीथी. त्यांच्या पुण्यतीथीनिमित्त ऋषी कपूर यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींचे फोटो शेअर केले आहेत.
'पर हम तुम्हारे रहेंगे सदा', असे कॅप्शन देत त्यांनी राज कपूर यांचा मेरा नाम जोकर चित्रपटातला एक फोटो शेअर केला आहे.
ऋषी कपूर आणि राज कपूर यांचे नाते वडील मुलापेक्षा मित्रत्वाचे होते. त्यामुळे राज कपूर यांच्या आठवणीत ऋषी कपूर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ते सध्या अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना आता लवकर मायदेशी परतण्याचीही ओढ लागली आहे.
राज कपूर यांचे हिंदी सिनेसृष्टीतील योगदान अमुल्य आहे. त्यांना ३ राष्ट्रीय पुरस्कार आणि ११ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले होते. भारत सरकारचा 'पद्म भूषण' हा पुरस्कारही त्यांना १९७१ साली मिळाला होता. 'दादासाहेब फाळके' पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.