ETV Bharat / sitara

'या' खास कारणामुळे ऋषी कपूर यांनी केलं साराचं कौतुक - कुली नंबर १ remake

सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहुन सोशल मीडियावर चाहत्यांनी तिचे कौतुक केले होत. ऋषी कपूर यांनीदेखील ट्विट करुन तिची प्रशंसा केली आहे.

'या' खास कारणामुळे ऋषी कपूर यांनी केलं साराचं कौतुक
author img

By

Published : Aug 8, 2019, 10:43 AM IST

Updated : Aug 8, 2019, 2:45 PM IST

मुंबई - 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खानने दोनच चित्रपटातून चाहत्यांची पसंती मिळवली आहे. अल्पावधीतच ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे. सोशल मीडियावरही ती काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. तिच्या गोड हास्याने आणि निरागसतेने ती चाहत्यांची नेहमीच मने जिंकते. तिच्या या गुणांमुळे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही तिचं कौतुक केलं आहे.

साराचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती स्वत:चे सामान स्वत:च घेऊन जात होती. अगदी सर्वसामान्य मुलींप्रमाणे तिने विमानतळावरुन रस्ता काढत सामान घेऊन जाताना दिसली होती. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनीही तिचे कौतुक केले होते.

'या' खास कारणामुळे ऋषी कपूर यांनी केलं साराचं कौतुक

ऋषी कपूर यांनीही तिचे कौतुक करत एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिलेय, 'खूप छान सारा, विमानतळावर सेलिब्रिटींनी कसे वागावे, याचे उत्तम उदाहरण तू तयार केले आहे. कोणालाही त्रास न देता स्वत:चे सामान स्वत: घेऊन जाणे, सोबतही कोणी नाही. कोणालाही न घाबरता तू तुझा आत्मविश्वास दाखवला'.

  • Wonderful Sara. You set examples how celebrities should behave at the airport. No harm at all tugging your own baggage, no chamchas to receive and the icing on the cake! No dark glasses or an airport look. You show confidence with no insecurities. Atta girl! https://t.co/vj5MDBRW4v

    — Rishi Kapoor (@chintskap) August 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हे आहेत साराचे आगामी चित्रपट
साराने अलिकडेच दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या 'आज कल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. तर, अभिनेता वरुण धवनसोबतही ती 'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये झळकणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 8, 2019, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.