नागपूर- येथे रंगलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ गाजली ती लोककलावंत रघुनाथ खेडकर आणि कांताबाई नगरकर यांच्या तमाशाने.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचा सन्मान करून त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गण गौळण, बतावणी आणि त्यानंतर पारंपरीक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीच्या लावण्याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. विशेष म्हणजे नाटय संमेलनासाठी आलेल्या अनेक सेलिब्रिटींनी या लोककलावंतांना मनापासून दाद दिली.