ETV Bharat / sitara

'तुझ्यात जीव रंगला'तील भाल्याचा खऱ्या आयुष्यात पोलीस बनण्यापर्यंतचा रंजक प्रवास - police

पोलीस प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षणाचा होणारा त्रास सहन न झाल्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट भाल्याने केला आहे. परंतु, येथील प्रशिक्षकांच्या सहकार्यामुळे असे केले नसल्याचे त्याने सांगितले.

भाल्याचा खऱ्या आयुष्यात पोलीस बनण्यापर्यंतचा रंजक प्रवास
author img

By

Published : Jun 6, 2019, 6:15 PM IST

Updated : Jun 6, 2019, 7:58 PM IST

अकोला - 'तुझ्यात जीव रंगला' या मराठी दूरचित्रवाहिनीवरील नाटकातून प्रसिद्धीस आलेला भाल्या म्हणजेच अतुल पाटील हा कलाकार आता पोलीस झाला आहे. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातून नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून तो उत्तीर्ण झाला आहे. कुस्तीपटू, अभिनेता आणि आता प्रत्यक्ष पोलीसाच्या भूमिकेत भाल्या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कर्तव्य बजावताना दिसणार आहे.

पोलीस प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षणाचा होणारा त्रास सहन न झाल्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, असा गौप्यस्फोट भाल्याने केला आहे. परंतु, येथील प्रशिक्षकांच्या सहकार्यामुळे असे केले नसल्याचे त्याने सांगितले. 'तुझ्यात जीव रंगला' या मराठी मालिकेतील राणादाचा जिवलग मित्र भाल्या म्हणजेच अतुल पाटील हा अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पोलीस बनण्यासाठी २० ऑगस्ट २०१८ ला दाखल झाला होता.

भाल्याचा खऱ्या आयुष्यात पोलीस बनण्यापर्यंतचा रंजक प्रवास

याबद्दल बोलताना अतुल पाटील म्हणाला, वडील पोलीस असतानाही मी कुस्ती खेळावी तसेच पोलीस विभागातही रुजू व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पोलीस प्रशिक्षण घेत असताना अभिनयाकडे दुर्लक्ष झाले. परंतु, आता तसे होणार नाही जसे कुस्ती अतुल पाटील हे समीकरण आहे. तसेच 'तुझ्यात जीव रंगला' या मराठी मालिकेतील राणादा आणि भाल्या हे आहे. त्यामुळे लवकरच या मालिकेत मी परतणार आहे, असा आशावाद व्यक्त करीत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Intro:अकोला - 'तुझ्यात जीव रंगला' या मराठी दूरचित्रवाहिनीवरील नाटकातून प्रसिद्धीस आलेला भाल्या उर्फ अतुल पाटील हा कलाकार आता पोलीस झाला आहे. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातून त्याने कठोर असे नऊ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून तो उत्तीर्ण झाला आहे. कुस्तीपटू अभिनेता आणि आता पोलीस या प्रत्यक्षातील भूमिकांमध्ये भाल्या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कर्तव्य बजावताना दिसणार आहे. पोलीस प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षणाचा होणारा त्रास सहन न झाल्याने पळून जाण्याचा निर्णय केला होता, असा गौप्यस्फोट भाल्या याने केला आहे. परंतु, येथील प्रशिक्षकांच्या सहकार्यामुळे निर्णय घेऊ शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले.

Body:'तुझ्यात जीव रंगला' या मराठी नाटकांमधील राणादाचा जिवलग मित्र भाल्या उर्फ अतुल पाटील हा अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पोलीस बनण्यासाठी 20 ऑगस्ट 2018 रोजी दाखल झाला होता. वडील पोलीस असतानाही त्यांनी कुस्ती खेळावी तसेच पोलीस विभागातही रुजू व्हावे अशी अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केली होती. त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पोलीस प्रशिक्षण घेत असतांना मराठी नाटकाकडे दुर्लक्ष झाले. परंतु, आता तसे होणार नाही जसे कुस्ती आणि अतुल पाटील हे जसे समीकरण आहे; तसेच 'तुझ्यात जीव रंगला' या मराठी नाटकांमधील राणादा आणि भाल्या हे आहे. त्यामुळे लवकरच या नाटकांमध्ये मी परत काम करणार, असा आशावाद त्याने व्यक्त करीत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
पोलीस प्रशिक्षणादरम्यान माझे असलेले एकशे पाच किलोचे वजन 80 किलो वर आले आहे. या प्रशिक्षणानंतर मी कोल्हापूर पोलिस दलात कर्तव्य बजावणार असून या केंद्रात मला माझे प्रशिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पोलिस विभागात चांगल्या प्रकारे कर्तव्य बजाऊ शकेल, असा आशावादही त्यांने व्यक्त केला.

Conclusion:भाल्याच्या डोळ्यात आले पाणी
पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर घरी परत जाण्याचा आनंद भाल्या उर्फ अतुल पाटील याच्या चेहर्‍यावर होता. मात्र, या प्रशिक्षण केंद्रात जीवाभावाचे मिळालेले मित्र आणि मार्गदर्शक तथा प्रशिक्षक यांच्या प्रेमामुळे भारावून गेलो असल्याचे सांगताना त्याच्या डोळ्यात मात्र पाणी आले.

भाल्या सोबत काढले अनेकांनी फोटो
मराठी नाटकांमध्ये काम करीत असताना प्रसिद्धी मिळालेला झाल्या उर्फ अतुल पाटील हा अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण करून कोल्हापूर पोलीस दलात रुजू होणार आहे. आज झालेल्या पासिंग परेड नंतर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांचे नातेवाईकही आले होते. या सहकाऱ्यांनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी भाल्या सोबत फोटो काढत आनंद व्यक्त केला.
Last Updated : Jun 6, 2019, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.