मुंबई - प्रसिद्ध गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात हृतिक रोशनने आनंद यांची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, आनंद कुमार यांच्याविषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यांना एका गंभीर आजाराने ग्रासले आहे, ज्यावर शस्त्रक्रिया देखील होऊ शकत नाही.
आनंद कुमार यांनीच त्यांच्या आजाराविषयी खुलासा केला आहे. आनंद यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की 'त्यांना ब्रेन ट्युमर आहे. मेंदुच्या नाजुक भागात हा ट्युमर असल्याने त्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. जर, शस्त्रक्रिया केली, तर त्यांना अर्धांगवायु होऊ शकतो. या ट्युमरमुळे त्यांची ऐकण्याची क्षमता फार कमी झालेली आहे. त्याचसाठी ते तपासणीसाठी गेले असता, त्यांना ट्यूमर असल्याचे समजले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सध्या त्यांच्यावर न्युरोसर्जन असलेले डॉ. बी. के. मिश्रा यांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित असलेला 'सुपर ३०' हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. येत्या १२ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्या प्रेरणादायी प्रवास पाहायला मिळेल.