ETV Bharat / sitara

राम कपूरने सहकलाकार शेफाली शहाची उडवली टर! - ‘दिल्ली क्राईम’मध्ये शेफाली शहा

अभिनेत्री शेफाली शहा तिचा नवरा, विपुल अमृतलाल शहाच्या ‘ह्यूमन’ या वेब सिरीजमध्ये काम करतेय व तिच्यासोबत अभिनेता राम कपूरसुद्धा काम करतोय. ‘ह्यूमन’च्या सेटवर ती एक ‘पॉवर नॅप’ घेत असताना तिचा सहकलाकार राम कपूरने ते क्षण व्हिडीओमध्ये बंदिस्त केले व नंतर तिला खूप चिडवले आहे.

Ram Kapoor
शेफाली शहा,राम कपूर
author img

By

Published : Feb 9, 2021, 8:00 PM IST

मुंबई - हल्लीच शेफाली शहाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दिल्ली क्राईम’ ला मानाचा आंतरराष्ट्रीय ‘एमी’ पुरस्कार मिळाला. तिच्या त्यातील अभिनयाचीही सर्वस्तरीय खूप तारीफ झाली व या सिरीजचा दुसरा सिझन येऊ घातलाय, ज्यात पुन्हा शेफालीची प्रमुख भूमिका असणार आहे. सध्या ती, तिचा नवरा, विपुल अमृतलाल शहाच्या ‘ह्यूमन’ या वेब सिरीजमध्ये काम करतेय व तिच्यासोबत अभिनेता राम कपूरसुद्धा काम करतोय.

राम कपूरने बनवला मजेशीर व्हिडिओ
आता सर्वांनाच माहित असेल की शूटिंगचा वेळा सांभाळताना कलाकारांची दमछाक होत असते. १२-१६ तास काम करत असताना जेवण, झोप यांचे खोबरे होत असते. बऱ्याचदा तब्येतीचेही नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु हाडाचा कलाकार याबद्दल तक्रारी न करता यातून आपापल्यापरीने मार्ग काढत असतो. दिवस रात्र शूटिंग करून देह थकतो व कित्येकदा कलाकार शूटच्या मध्ये थोडी झोप काढतो. अभिनेत्री शेफाली शहाच्या बाबतीतही असेच काहीसे घडत असून ती सेटवरच ‘पॉवर नॅप’ म्हणजेच छोटीशी झपकी काढत असते. ‘ह्यूमन’च्या सेटवर ती अशीच एक ‘पॉवर नॅप’ घेत असताना तिचा सहकलाकार राम कपूरने ते क्षण व्हिडीओमध्ये बंदिस्त केले व नंतर तिला खूप चिडवले. कीर्ति कुल्हारी आणि राम कपूर यांच्यासह डिजिटल शोच्या शूटिंगला सुरुवात करणार्‍या शेफालीचाही ‘कॉल टाइम’ पहाटेचा होता. आधीचा दिवस खूपच व्यस्ततेत गेल्यामुळे व पहाटे लांबचा प्रवास करून आलेला थकवा जाणविल्यामुळे शेफाली ने एक डुलकी काढण्याचे ठरविले. शूट सुरु होण्यास वेळ होता कारण अजून ‘लाइटिंग’ सुरु होते. नेमक्या त्याच वेळी राम कपूर ने तिच्या नकळत तिच्या डुलकी चा छोटासा व्हिडीओ बनविला. नंतर तो मजेदार क्षण सर्वांनीच एन्जॉय केला. बरेचजणांना माहिती नाही की राम आणि शेफाली मित्र खूप चांगले मित्र आहेत व जवळजवळ दोन दशकांपासून एकमेकांना ओळखतात. यापूर्वी त्यांनी मीरा नायरचा ‘मॉन्सून वेडिंग’, नागेश कुकनूरचा ‘लक्ष्मी’ आणि मीरा नायरचा लघुपट ‘गॉड रूम’ यासह तीन चित्रपट एकत्र केले आहेत. मानवी औषध चाचणी आणि वैद्यकीय घोटाळ्याबद्दलचे नाट्य ‘ह्युमन’मधून दर्शविण्यात येणार असून ही वेब मालिका विपुल शहा आणि मोझेझसिंग यांच्या सह-दिग्दर्शनात चित्रित होत आहे. हेही वाचा - कपूर खानदानातील निखळला अजून एक तारा, चिंटू पाठोपाठ चिंपूनेही घेतला निरोप!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.