ETV Bharat / sitara

राखी अडकली लग्नबंधनात? लग्नाच्या व्हायरल फोटोवर काय म्हणते 'ड्रामा क्विन' - ब्रायडल लूक

राखीने एका एनआरआय व्यक्तीसोबत गुप्तपणे लग्नगाठ बांधली असल्याच्या चर्चा अलिकडेच सोशल मीडियावर रंगल्या होत्या. एवढंच काय तर मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये तिचा विवाह सोहळा पार पडल्याचेही बोलले गेले.

राखी अडकली लग्नबंधनात?, लग्नाच्या व्हायरल फोटोवर काय म्हणते 'ड्रामा क्विन'
author img

By

Published : Jul 29, 2019, 6:32 PM IST

मुंबई - बॉलिवूडची 'ड्रामा क्विन' राखी सावंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीझोतात येत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिचे लग्न. होय तिच्या लग्नाच्या चर्चांना सध्या सोशल मीडियावर उधाण आले आहे. तिचे ब्रायडल लूकमधील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून राखीने लग्न केले की काय? असे प्रश्न चाहते विचारत आहेत.

राखीने एका एनआरआय व्यक्तीसोबत गुप्तपणे लग्नगाठ बांधली असल्याच्या चर्चा अलिकडेच सोशल मीडियावर रंगल्या होत्या. एवढंच काय तर मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये तिचा विवाह सोहळा पार पडल्याचेही बोलले गेले. मात्र, याबाबत राखीने आता स्वत:च एक खुलासा केला आहे.

राखीने एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की 'मी लग्न बंधनात अडकली नाही. मी फक्त ब्रायडल फोटोशूट केले आहे', असे म्हणून तिने लग्नाचे वृत्त फेटाळले आहे.

राखीच्या लग्नाच्या यापूर्वीही चर्चा झाल्या होत्या. दीपक कलालसोबत ती लग्न करणार होती. मात्र, पुढे तिने हे लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.