मुंबई - कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेल्या 'भूल भुलैय्या २' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 'भूल भुलैय्या' चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटातही अभिनेता राजपाल यादव यांच्या कॉमेडीचा तडका लागणार आहे. आपल्या कॉमेडी अंदाजाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे त्यांना 'भूल भुलैय्या २' मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
राजपाल यादव यांनी 'हेरा फेरी', 'चुप चुप के' आणि 'हंगामा' यांसारख्या चित्रपटात आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. 'भूल भुलैय्या' चित्रपटातही त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती. नटवर उर्फ छोटा पंडित अशी त्यांची भूमिका होती.
हेही वाचा -'भूल भुलैय्या २'च्या शूटिंगला सुरुवात; कार्तिक म्हणतो, या लुकमध्ये....
'भूल भुलैय्या २' मध्येही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे फार आनंदी असल्याचे ते म्हणाले आहे. तसेच दिग्दर्शक अनिस बझ्मी आणि निर्माते भूषण कुमार यांचे आभारही मानले आहेत.
'भूल भुलैय्या २' चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कियारा आडवाणी, तब्बू यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. ३१ जुलै २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
हेही वाचा -'फ्रेंड्स'चं होणार रियुनियन, 'या' कारणासाठी येणार पुन्हा एकत्र