ETV Bharat / sitara

राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या 'रूहअफ्जा'चं शूटिंग सुरू, नावात झाला 'हा' बदल - Dinesh Vijan

'रूही अफ्जा'चे क्लॅप बोर्डवर चित्रपटाच्या नावात बदल झालेला दिसत आहे. हा फोटो शेअर करून जान्हवीने यावर 'करने आ रहे है आपके अटेंशन का कब्जा, आज से शुरू होती है रुही अफ्जा', असे खास कॅप्शनही दिले आहे.

राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या 'रूहअफ्जा'चं शूटिंग सुरू, नावात झाला 'हा' बदल
author img

By

Published : Jun 15, 2019, 8:25 AM IST

मुंबई - 'धडक' गर्ल जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या 'रूहअफ्जा' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. जान्हवीने शूटिंग सुरू झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. मात्र, तिने शेअर केलेल्या फोटोमधून या चित्रपटाच्या नावात थोडा बदल केला असल्याचे दिसून येत आहे.
होय, सुरुवातीला 'रूहअफ्जा' असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या नावात आता किंचीत बदल करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचे नाव 'रुही अफ्जा' असे करण्यात आले आहे.

'रूही अफ्जा'चे क्लॅप बोर्डवर चित्रपटाच्या नावात बदल झालेला दिसत आहे. हा फोटो शेअर करून जान्हवीने यावर 'करने आ रहे है आपके अटेंशन का कब्जा, आज से शुरू होती है रुही अफ्जा', असे खास कॅप्शनही दिले आहे.

Rajkummar Rao, Janhvi Kapoor  RoohiAfza filming started
राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या 'रूहअफ्जा'चं शूटिंग सुरू, नावात झाला 'हा' बदल

हार्दिक मेहता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, दिनेश विजन आणि मृगदीप सिंग लांबा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. राजकुमार रावने यापूर्वी दिनेश विजनसोबत 'स्त्री' चित्रपटात काम केले आहे. आता राजकुमार आणि जान्हवी 'रुही अफ्जा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरातील गोष्टीवर आधारित आहे. या चित्रपटात जान्हवीची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २० मार्च २०२० रोजी प्रदर्शित होईल.

Intro:Body:

Ashvini

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.