काही दिवसापूर्वी एका महिलेने साडी परिधान करून व्यायामशाळेत व्यायाम केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ही महिला म्हणजे पुण्यातील डॉक्टर शर्वरी इनामदार होत्या. आता असाच आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. या महिलेने लेहेंगा चोली परिधान केली असून वधूच्या पोशाखात ती पुश अप करतानाचा हा व्हिडिओ आहे. या महिलेच्या इन्स्टाग्राम बायोनुसार "पर्सनल कोच" असलेल्या ऐना अरोरा यांनी पारंपरिक पोशाखात व्यायाम केल्यामुळे त्या खूप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जुलै महिन्यात ही पोस्ट शेअर करण्यात आली असली तरी दोन दिवसापूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्ह्डिओत ऐना यांनी लाल रंगाची नक्षीदार ब्रायडल लेहेंगा चोली आणि दागिने परिधान करुन पुश-अप करीत आहेत.
वधूच्या पोशाखात असलेल्या ऐना अरोरा यांच्या चेहऱ्यावर पूर्ण मेक अप दिसत आहे. अशा अनोख्या रितीने पुश अप केल्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इंस्टाग्रामवर 81,000 हून अधिक फॉलोअर्स असलेल्या ऐना अरोरा फिटनेससाठी नियमीत व्यायाम करीत असतात. त्यांनी अनेक वेळा जिममध्ये वर्क आऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
हेही वाचा - साडी नेसून व्यायाम करणाऱ्या डॉक्टर